अव्वल खेळाडूंसाठी लीग सारख्या स्पर्धा सुरू कराव्यात - पुलेला गोपीचंद

टीम ई-सकाळ
Wednesday, 16 September 2020

भारतीय बॅडमिंटन संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी देशात खेळ सुरू होण्याच्या दृष्टीने अनेक लहान लीग आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

भारतीय बॅडमिंटन संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी देशात खेळ सुरू होण्याच्या दृष्टीने अनेक लहान लीग आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या लीगमध्ये शीर्ष क्रीडापटूंसाठी जैव-सुरक्षित वातावरण निर्माण करून पुन्हा खेळाला सुरवात करण्याची गरज असल्याचे मत पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे. अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एएफआय) आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये गोपीचंद बोलत होते.

इटालियन टेनिस स्पर्धा: 18 वर्षीय नवोदितासमोर तीन वेळचा ग्रँडस्लॅम विजेता पराभूत

यावेळेस  पुलेला गोपीचंद यांनी, शारीरिक अंतराच्या नियमांमुळे पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावर स्पर्धा आयोजित करणे शक्य होणार नसल्याचे म्हटले. मात्र प्रत्येक खेळात स्थानिक पातळीवर अव्वल खेळाडूंमध्ये लहान लीग सारख्या स्पर्धा आयोजित करू शकतो, असे सांगितले. तसेच एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी देखील यावेळेस पुलेला गोपीचंद यांनी सांगितलेल्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. याशिवाय एलीट खेळाडू जून पासून राष्ट्रीय शिबिरात असल्याचे सांगत, ऑक्टोबरपासून ते कठोर प्रशिक्षण सुरू करणार असल्याचे सुमारीवाला यांनी सांगितले. 

ENGvsAUS : स्टार्कचा जबऱ्या स्टार्ट; पहिल्या दोन चेंडूत दोन गड्यांना धाडले...

''ऑलिम्पिक सुरू होण्यास उशीर झाल्यामुळे आम्हाला चांगल्या कामगिरीचा विश्वास आहे कारण यामुळे आपले युवा खेळाडू अधिक परिपक्व होतील आणि त्यांची तयारी अधिक चांगली होईल. आणि खेळाडूंच्या तयारीसाठी विस्तृत कार्यक्रम आखला असून, आम्ही जानेवारीपासून कठोर स्पर्धेची अपेक्षा करीत आहोत'', असे आदिल सुमारीवाला यांनी यावेळेस सांगितले. इतकेच नाहीतर कोरोनाची लस उपलब्ध झाल्यावर आगामी ऑलिम्पिक मध्ये जाणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्याचे आवाहन केंद्र सरकारला केल्याचे सुमारीवाला यांनी नमूद केले.


​ ​

संबंधित बातम्या