गोपीचंद सरांची उणीव टोकियोत भासणार नाही

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 June 2021

टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी नवे मार्गदर्शक पार्क तेई सँग यांच्याबरोबर माझा चांगला सराव सुरू आहे. त्यामुळे गोपीचंद सरांची उणीव भासणार नाही, असे पी. व्ही. सिंधूने सांगितले.

हैदराबाद - टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी नवे मार्गदर्शक पार्क तेई सँग यांच्याबरोबर माझा चांगला सराव सुरू आहे. त्यामुळे गोपीचंद सरांची उणीव भासणार नाही, असे पी. व्ही. सिंधूने सांगितले.

ऑलिंपिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीसाठी केवळ सिंधूच पात्र ठरली आहे. सिंधूने यापूर्वीच ऑलिंपिकसाठी गोपीचंद अकादमीऐवजी गचिबावली स्टेडियममध्ये सराव करण्याचे ठरवले आहे. आता आपल्याला सुरुवातीपासून मार्गदर्शक असलेल्या गोपीचंद यांची उणीव भासणार नाही, असे तिने सांगितले. 

पूर्वतयारी चांगली होत आहे. गोपी सरांची उणीव टोकियोत भासणार नाही. मी पार्क यांच्यासह पाच ते सहा तास सराव करीत आहे. त्याचबरोबर सुचित्रा अकादमीत तंदुरुस्तीकडे लक्ष देत आहे, असे सिंधूने सांगितले. तिने पार्क यांच्या पूर्णपणे वैयक्तिक मार्गदर्शनाचा फायदा होत असल्याचे सांगितले.

गोपीचंद अकादमीतून आम्ही बाहेर पडल्यापासून सराव चांगला होत आहे. त्यासाठीचे प्रत्येक मिनीट सत्कारणी लागत आहे. पार्क माझ्या मनात काय सुरू आहे, हे जाणतात. मी दडपणाखाली असते किंवा प्रतिकूल परिस्थितीतून जात असते, त्या वेळी ते मला स्वतःशी संवाद साधण्यास वेळ देतात, असेही ती म्हणाली.  

जगज्जेती म्हणाली...

  • माझ्या आत्तापर्यंतच्या वाटचालीचे श्रेय कोणा एकास देणे अयोग्य होईल
  • रॅकेट प्रथम हातात घेतली, त्यावेळी माझ्यासोबत खेळणाऱ्यांनीही माझा खेळ घडवला
  • गोपी सर हे माझ्या खेळाचा प्रवासाचा भाग आहेत
  • खर सांगायचे झाले तर मी प्रत्येकाची लाडकी आहे
  • ऑलिंपिकमध्ये भारताची एकमेव महिला बॅडमिंटनपटू असल्यामुळे जास्त दडपण

​ ​

संबंधित बातम्या