बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग हे एक साहसच - किदांबी श्रीकांत 

संजय घारपुरे
Thursday, 15 October 2020

डेन्मार्क ओपन स्पर्धेतील विजयी सलामीनंतर किदांबी श्रीकांतचे मत 

मुंबई : डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनपाठोपाठ किदांबी श्रीकांतने विजयी सलामी दिली. त्याने स्पर्धेतील सहभाग हे एक प्रकारचे साहसच असल्याचे सांगितले. श्रीकांतने 2017 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. त्याने उंचापुऱ्या टॉबी पेरीती याला 21-12, 21-18 असे पराजित केले. पहिल्या गेममधील सहज वर्चस्वानंतर श्रीकांतला दुसऱ्या गेममध्ये संघर्षास सामोरे जावे लागले. पण त्याने 15-15 बरोबरीनंतर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
 
माझी सुरुवात चांगली होती. पण दुसऱ्या गेममध्ये त्याचा खेळ उंचावला. मी दीर्घ कालावधीनंतर खेळत आहे. स्पर्धेत खेळणे हेच एक आव्हान आहे. ते एक प्रकारचे साहसच आहे. ही परिस्थितीच सर्वांसाठी नवीन आहे. एवढा दीर्घ ब्रेक कधीही अनुभवलेला नाही. पहिल्या फेरीतील खेळावर नक्कीच समाधानी आहे, असे श्रीकांतने स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळास सांगितले. 

पंजाबचा किंग म्हणतो, आम्ही सर्व सामने जिंकून कमबॅक करू, पाहा व्हिडिओ

मार्चमध्ये ऑल इंग्लंड खेळलो होतो. तिथे पहिल्याच फेरीत हरलो होतो. त्यानंतर प्रथमच स्पर्धा खेळत आहे. त्यामुळे सामन्याचा सराव नव्हता. आता हळूहळू याची सवय होईल. त्यास वेळ लागेल. या स्पर्धेनंतर यंदा एकही स्पर्धा नाही. त्यामुळे स्पर्धेत खेळण्याची सवय होण्यास जास्तच वेळ लागेल, असे त्याने सांगितले. 

''धोनीने उन्हात केस पांढरे केले नाहीत, त्यामुळेच तो वेगळा ठरतो....

ऑल इंग्लंडहून मायदेशी परतल्यावर चार महिने गुंटूरलाच होतो. तिथे उच्च दर्जाच्या सरावाच्या सोयी नाहीत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून हैदराबादला सराव सुरू झाला. पूर्ण जोषात उच्च दर्जाचा सराव होण्यास काही आठवडे लागले. पूर्ण मोसम सुरू झाल्यावरच किती प्रगती करू शकेन, याचा अंदाज येऊ शकेल, असे त्याने सांगितले. 

या स्पर्धेत जास्तीत जास्त सामने खेळण्याचे माझे लक्ष्य आहे. या स्पर्धेद्वारे जागतिक स्तरावर सध्या मी नेमका कुठे आहे, याची कल्पना येऊ शकेल. त्यामुळेच मी या स्पर्धेत खेळत आहे. बॅडमिंटनच्या स्पर्धांना जानेवारीत नियमितपणे सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. या स्पर्धेतील कामगिरीचे विश्‍लेषण करून त्यानुसार सरावाची आखणी करता येईल. 
- किदांबी श्रीकांत


​ ​

संबंधित बातम्या