ऑलिंपिक हव की नको, हे सांगणे कमालीचे अवघड

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 May 2021

टोकियो ऑलिंपिकचे संयोजन तीन महिन्यांनी करणे योग्य होईल का, याबाबत मत व्यक्त करणे अवघड आहे, असे जपानमधील आघाडीची टेनिसपटू नाओमी ओसाका हिने सांगितले.

टोकियो - टोकियो ऑलिंपिकचे संयोजन तीन महिन्यांनी करणे योग्य होईल का, याबाबत मत व्यक्त करणे अवघड आहे, असे जपानमधील आघाडीची टेनिसपटू नाओमी ओसाका हिने सांगितले.

वाढत्या कोरोना रुग्णामुळे टोकियोतील आणीबाणी मेअखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. एक खेळाडू या नात्याने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा खेळणे नक्कीच आवडेल, असे चार ग्रँडस्लॅम जिंकलेल्या ओसाकाने सांगितले; पण त्याच वेळी मी समाजाची घटक आहे. सध्या आपण महामारीस सामोरे जात आहोत. लोक आजारी असतील, त्यांना सुरक्षित वाटत नसेल, तर ऑलिंपिक स्पर्धा नक्कीच चिंतेची बाब आहे, असे तिने सांगितले.

ऑलिंपिकच्या निमित्ताने दोनशे देशातील दहा हजारहून जास्त क्रीडापटू टोकियोत येतील. ही स्पर्धा प्रेक्षकांविना होईल, अशी चिन्हे आहेत. ऑलिंपिक यापूर्वी मी कधीही खेळलेले नाही. त्यामुळे प्रेक्षकांविना ऑलिंपिक कसे असेल, हे सांगू शकणार नाही, असेही तिने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या