कोरोनामुळे आता बॅडमिंटन जगतातील 'ही' स्पर्धा देखील रद्द  

टीम ई-सकाळ
Tuesday, 15 September 2020

कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील अनेक देशांनी माघार घेतल्यामुळे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) डेन्मार्कमधील थॉमस अँड उबर चषक स्पर्धा 2021 पर्यंत पुढे ढकलली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील अनेक देशांनी माघार घेतल्यामुळे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) डेन्मार्कमधील थॉमस अँड उबर चषक स्पर्धा 2021 पर्यंत पुढे ढकलली आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे थायलंड, ऑस्ट्रेलिया, चीनी तैपेई आणि अल्जेरियानंतर इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियाने शुक्रवारी 11 तारखेला यंदाच्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर बीडब्ल्यूएफने रविवारी 13 तारखेला तातडीची आभासी बैठक बोलावली होती. 

IPL2020 ची संपूर्ण तयारी झाली; दादाने शेअर केले खास फोटो

बीडब्ल्यूएफ घेतलेल्या या बैठकीनंतर 2020 मधील यजमान डेन्मार्कच्या संमतीने थॉमस आणि उबर कप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय अनेक प्रतिस्पर्धी संघांनी आपली नावे मागे घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बीडब्ल्यूएफने सांगितले. तसेच सुधारित बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या युरोपियन टप्प्यामुळे 2021 पूर्वी पर्यायी कार्यक्रम बनविणे आता अवघड झाले असल्याचे बीडब्ल्यूएफने आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. 

IPL 2020 : सलामीच्या लढतीपूर्वी रोहित-धोनीनं घेतला गल्ली क्रिकेटचा आनंद (Video)

बीडब्ल्यूएफने सिंगापूर आणि हाँगकाँगला यंदाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिला. तर चीन आणि जपान यांनी देखील स्पर्धेत सहभागी न होण्याचा विचार करत असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. याव्यतिरिक्त भारताने 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी महिला आणि पुरुष या दोन्ही संघांची घोषणा केली होती. मात्र भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालनेही अशा वेळी या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. सायना आणि पीव्ही सिंधू महिला संघाचे नेतृत्व करीत होते तर मेन्स संघात माजी जागतिक क्रमवारीत किदांबी श्रीकांतचा समावेश होता.

त्यानंतर डेन्मार्क ओपन पूर्व निर्धारित नियोजित वेळापत्रकानुसार 13 ते 18 ऑक्टोबर दरम्यान ओडेंसमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे बीडब्ल्यूएफने स्पष्ट केले आहे. परंतु 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणारी व्हिक्टर डेन्मार्क मास्टर रद्द करण्यात आली आहे.  


​ ​

संबंधित बातम्या