आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनला सुरुवात; भारताच्या लक्ष्य सेनची शानदार विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

लक्ष्यने पहिला गेम 1-2 या माफक पिछाडीनंतर जिंकला. जम बसल्यावर त्याचा खेळ बहरत गेला. त्याने 14-9 आघाडीनंतर सलग सात गुण जिंकण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या गेममध्ये आघाडी सतत बदलत होती. लक्ष्यने 16-14 आघाडीनंतर सलग चार गुण जिंकत आघाडी भक्कम केली.  

नवी दिल्ली : सात महिन्यांच्या ब्रेकनंतर सुरू झालेल्या स्पर्धात्मक बॅडमिंटनच्या पहिल्याच लढतीत लक्ष्य सेनने विजय मिळवला. गेल्या दोन वर्षांपासून वेगाने प्रगती करीत असलेल्या लक्ष्यने डेन्मार्क ओपन स्पर्धेतील सलामीची लढत दोन गेममध्येच जिंकली. ऑल इंग्लंड स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्थगित झाले होते. त्यास आता डेन्मार्क ओपनने सुरुवात झाली आहे; पण या स्पर्धेनंतर या वर्षी एकही स्पर्धा होणार नाही. जागतिक क्रमवारीत 27 व्या असलेल्या एकोणीस वर्षीय लक्ष्यने या स्पर्धेच्या सलामीच्या फेरीत ख्रिस्तिवो पोपोव याला 21-9, 21-15 असे पराजित केले.

IPL 2020 : CSKvsSRH : धोनीच्या चेन्नईनं वॉर्नरच्या हैदराबादला रोखलं!

लक्ष्यने पहिला गेम 1-2 या माफक पिछाडीनंतर जिंकला. जम बसल्यावर त्याचा खेळ बहरत गेला. त्याने 14-9 आघाडीनंतर सलग सात गुण जिंकण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या गेममध्ये आघाडी सतत बदलत होती. लक्ष्यने 16-14 आघाडीनंतर सलग चार गुण जिंकत आघाडी भक्कम केली.  

IPL2020 : 'येलोमय' घराची अनटोल्ड स्टोरी; चेन्नईच्या चाहत्याने घराला दिले धोनीचे नाव

या सामन्यात माझ्या हालचाली चांगल्या झाल्या आणि विजयाइतकेच तेही महत्त्वाचे आहे, असे लक्ष्यने सांगितले. तो म्हणाला, दुसऱ्या गेममध्ये काही वेळ मागे पडत होतो; मात्र ते माझ्या चुकांमुळे घडले. या चुका करण्यात यश आले; तसेच त्यानंतर चांगली लयही गवसली. सात महिन्यानंतर कोर्टवर लढत खेळत होतो. त्या वेळी काही फार वेगळे वाटले नाही, असे लक्ष्यने सांगितले.  


​ ​

संबंधित बातम्या