विलगीकरण लक्षात घेऊन बॅडमिंटनचा कार्यक्रम 

संजय घारपुरे
Friday, 28 August 2020

थॉमस - उबेर स्पर्धा 3 ते 11 ऑक्‍टोबर दरम्यान डेन्मार्कला आहे. त्यानंतर तिथेच दोन डेन्मार्क ओपन स्पर्धा होतील. यातील दुसरी स्पर्धा संपल्यावर पंधरा दिवसांचा ब्रेक असेल, ज्याद्वारे खेळाडू आशियात विलगीकरण करुन तेथील स्पर्धा खेळू शकतील.

नवी दिल्ली :  जागतिक बॅडमिंटन महासंघाने भारतातील दोन प्रमुख स्पर्धा रद्द केल्या आहेत, मात्र नव्याने आंतरराष्ट्रीय कार्यक्रम तयार करताना पंधरा दिवसांचे विलगीकरण लक्षात घेऊन कार्यक्रमाची आखणी केली आहे.  मार्चमधील इंडिया ओपन नव्या कार्यक्रमानुसार 8 ते 13 डिसेंबर दरम्यान होती, तर सय्यद मोदी स्पर्धा 17 ते 22 नोव्हेंबर दरम्यान लखनौला घेण्याचे ठरले होते. या दोन्ही स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. जागतिक महासंघाने ऑक्‍टोबरपासून स्पर्धा सुरु करताना विलगीकरणाचा कालावधी लक्षात घेतला आहे. त्यामुळे एकाच देशात लागोपाठ स्पर्धा घेतल्या आहेत. 

केंद्र सरकार घेणार चीनच्या सहभागाची स्पर्धा

थॉमस - उबेर स्पर्धा 3 ते 11 ऑक्‍टोबर दरम्यान डेन्मार्कला आहे. त्यानंतर तिथेच दोन डेन्मार्क ओपन स्पर्धा होतील. यातील दुसरी स्पर्धा संपल्यावर पंधरा दिवसांचा ब्रेक असेल, ज्याद्वारे खेळाडू आशियात विलगीकरण करुन तेथील स्पर्धा खेळू शकतील. त्यानुसार या दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर सलग दोन सुपर एक हजार स्पर्धा होतील आणि त्यानंतर लगेचच जागतिक स्पर्धा मालिकेतील अंतिम टप्प्याची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे ठिकाण अद्याप निश्‍चित झालेले नाही. 

अँडरसनच्या धमाकेदार कामगिरीनंतर युवराजने दिलं बुमराहला टार्गेट

जागतिक बॅडमिंटन महासंघाने मे महिन्यात नवा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकली नाही. विलगीकरणाचे नियम लक्षात घेतल्यास हे कार्यक्रम अमलात येणे अवघडच होईल याची जाणीव जागतिक बॅडमिंटन महासंघास झाली आणि त्यांनी नव्याने वेळापत्रक तयार केले. त्याचबरोबर स्पर्धा होत असलेल्या देशातील स्पर्धा नियमावलीचे पालन कसोशीने करणे बंधनकारक असेल. ते मोडल्यास स्पर्धेतील नोंदणी रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


​ ​

संबंधित बातम्या