जागतिक बॅडमिंटन फेडरेशनला कोरोनाचा सर्वांत मोठा आर्थिक फटका

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 May 2021

कोरोना महामारीच्या संकटातून क्रिकेट, जागतिक क्लब फुटबॉल आणि इतर खेळांनी मार्ग काढून आपली गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु जागतिक बॅडमिंटनला अजूनही रस्ता सापडलेला नाही, त्यामुळे नऊ दशलक्ष डॉलरचा फटका त्यांना बसला आहे.

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या संकटातून क्रिकेट, जागतिक क्लब फुटबॉल आणि इतर खेळांनी मार्ग काढून आपली गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु जागतिक बॅडमिंटनला अजूनही रस्ता सापडलेला नाही, त्यामुळे नऊ दशलक्ष डॉलरचा फटका त्यांना बसला आहे. एकीकडे हा मोठा आर्थिक फटका बसत असताना ७० टक्के महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने वार्षिक अहवाल जाहीर केला. साधारणतः त्यांना प्रतिवर्षी चार दशलक्ष डॉलरचा फायदा होत असतो, परंतु २०२० मध्ये त्यांना नऊ दशलक्ष डॉलरचा तोटा सहन करावा लागला आहे. थॉमस उबर कप, वर्ल्ड टूर फायनल्स अशा दोन स्पर्धा रद्द झाल्या आहेत. टोकियो ऑलिंपिकबाबत अजून शंका आहे.


​ ​

संबंधित बातम्या