'मी निवृत्त', बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूच्या ट्विटमुळे खळबळ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

भारताची महिला बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने अचानक मी निवृत्त असं ट्विटरवर पोस्ट केल्यानं खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने सोमवारी अचानक चाहत्यांना धक्का दिला आहे. तिने एक पोस्ट करत मी निवृत्त असं म्हटलं आहे. डेन्मार्क ओपन आपली शेवटची स्पर्धा होती असं तिने म्हटलं आहे.

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या सिंधूने ट्विटरवर तीन पेजेस शेअर केली आहेत. यामध्ये एका पेजवर डेन्मार्क ओपन माझी शेवटची स्पर्धा होती आणि मी निवृत्त असं म्हटलं आहे. तिची ही ट्विटर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिने सुरुवातीला निवृत्त असं म्हटलं असलं तरी शेवटच्या पेजवर तिने संभ्रमात टाकणारं वक्तव्य केलं आहे. आपण एशिया ओपनसाठी असणार आहे. 

काही दिवसांपूर्वी ती लंडनला गेली होती. तेव्हा घरगुती वादामुळे ती गेल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र असे काही नसल्याचे सांगत तिने फेटाळून लावले होते. हैदराबादमध्ये सराव होत नसल्याचं कारण तेव्हा सांगितलं होतं.

त्याआधी पीव्ही सिंधूच्या वडिलांनी प्रशिक्षक गोपिचंद यांच्यावरही आऱोप केले होते. तिला संधी दिली जात नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 

 


​ ​

संबंधित बातम्या