Badminton Ranking: रेड्डी-पोनप्पा जोडीची कमाल, सायनाची मोजकी मजल, सिंधू जैसे थे!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 2 February 2021

सात्विक आणि अश्विनीने क्वार्टर फायनलमध्ये चान पेंग सून आणि गोह लियु यिंग या पाचव्या मानांकित मलेशियन जोडीला पराभूत केले होते.

आशियाई स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा मिश्र दुहेरीतील भारतीय जोडीला फायदा झाला आहे. बॅडमिंटन वर्ल्ड रँकीमध्ये या जोडीने पहिल्या 20 मध्ये स्थान मिळवले आहे. सात्विक आणि अश्विनी यांनी टोयोटा थायलंड ओपन स्पर्धेच्या सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. कोणत्याही सुपर 1000 वर्ल्ड टूर टूर्नामेंटमध्ये अंतिम चारमध्ये पोहचणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली होती. या कामगिरीमुळे त्यांनी 16 स्थानांची झेप घेत 19 व्या क्रमांकावर पोहचली आहे.  

 
सात्विक आणि अश्विनीने क्वार्टर फायनलमध्ये चान पेंग सून आणि गोह लियु यिंग या पाचव्या मानांकित मलेशियन जोडीला पराभूत केले होते. पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिराग शेट्टीने  टोयोटा थायलंड ओपनमध्ये सेमीफायनल गाठत दहावे स्थान कायम राखले आहे.  महिला एकेरीत ऑलिम्पिक पदव विजेती पीव्ही सिंधू सातव्या स्थानावर आहे. सायना नेहवालच्या क्रमावरीत एका स्थानाने सुधारणा झाली असून ती 19 व्या स्थानावर पोहचली आहे.

 प्रेमानं भारवलेल्या टी नटराजनच्या मनातली गोष्ट

पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत एका स्थानाच्या सुधारणेसर 13 व्या क्रमांकावर विराजमान झालाय. समीर वर्मा याने क्रमावरीत चार स्थांनानी सुधारणा नोंदवली असून तो आता 27 व्या स्थानावर आहे.   कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे बी साई प्रणीतला थायलंड ओपन स्पर्धेतून माघार घेतली होती. याचा त्याला फटका बसला असून तो 17 व्या स्थानावर घसरला आहे. दुखापतीमुळे अर्ध्यावर डाव सोडणाऱ्या पारुपल्ली कश्यप 26 व्या स्थानावर घसरण झालीय.  एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला पुरुष दुहेरीत 33 स्थानांनी झेप घेत 64 व्या स्थानावर आहेत.  
 


​ ​

संबंधित बातम्या