कोरोना प्रतिबंधक लस आवश्यकच : बॅडमिंटनपटू साईप्रणीत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

साईप्रणीतच्या आधी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनेही करोना लस अनिवार्य करण्याबाबत आक्षेप नोंदवला होता

कोरोना प्रतिबंधक लस आवश्यक आहेच, पण ही लस आलीच ती तर जागतिक उत्तेजक विरोधी पथकाकडून (वाडा) मंजूर करून घ्यावी कारण क्रीडा स्पर्धांना पुन्हा सुरुवात होण्यासाठी ती आवश्यक आहे अशी सूचना जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ब्राँझपदकाची कमाई करणारा भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू बी. साईप्रणीत याने केली आहे. तसेच परिस्थिती निवळली तरी करोना प्रतिबंधक लशीशिवाय पुन्हा सामान्य जीवन जगणे कठीण होईल. खेळाडू असल्याने आम्हाला सतत परदेशात तसेच विविध शहरांमध्ये प्रवास करावा लागतो. आता तर आम्ही स्पर्धांसाठी चीन, कोरियाला जायलाच घाबरू त्यासाठी वाडाने हे पाऊल उचलणे गरजेचे आहे.

मुरली विजयसोबत डिनर डेटसाठी एलिस पेरी तयार, पण घातली ही अट.. 

काय म्हणतोय बी. साईप्रणीत
'जोकोविचसारखी चिंता मला वाटत नाही; पण या लशीमुळे क्रीडापटूंवर उलटे परिणाम होऊ नयेत असे मला वाटते. ज्या औषधांवर वाडाने बंदी घातली आहे. त्या औषधांचा वापर करून लस तयार झाली असेल, तर आम्हाला आधीच सजग व्हावे लागेल. त्यासाठी जर का लस तयार झालीच, तर ती वाडाला दाखवावी,वाडानेही यामध्ये नक्की लक्ष घालावे. जर का कामगिरी उंचावणाऱ्या एखाद्या औषधाचा लशीत समावेश असेल तर त्यांनी ते औषध आपल्या बंदी घातलेल्या औषधांच्या यादीतून वगळावे. तांत्रिकदृष्ट्या बघायचे झाले, तर करोनाच्या लशीमुळे आम्हा खेळाडूंची कामगिरी उंचावेल असे काही होणार नाही.' साई म्हणाला की, प्रवासाच्या निमित्ताने विमानतळावर जावे लागते जिथून संसर्गाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सातत्याने मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे यावर लक्ष द्यावे लागेल. साईप्रणीतच्या आधी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनेही करोना लस अनिवार्य करण्याबाबत आक्षेप नोंदवला होता
 


​ ​

संबंधित बातम्या