पुण्याच्या नेहा पंडितने पटकाविले जेतेपद

वृत्तसंस्था
Monday, 27 August 2018

लातूर येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटाच्या 
एकेरीचे विजेतेपद पुण्याच्या नेहा पंडितने पटकाविले.

पुणे : लातूर येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटाच्या 
एकेरीचे विजेतेपद पुण्याच्या नेहा पंडितने पटकाविले. 

या स्पर्धेच्या अंतिम लढतीत द्वितीय मानांकन असलेल्या नेहा पंडितने पुण्याच्याच दुसऱ्या मानांकित श्रुती मुंदडाचा रंगतदार सामन्यात 21-14, 19-21, 21-16 असा पराभव केला होता. नेहा पंडितचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे विजेतेपद आहे. 

उपांत्य फेरीत नेहा पंडितने ठाण्याच्या रेवती देवस्थळीवर 12-21, 21-18, 21-15 असा, तर 
श्रुती मुंदडाने नागपूरच्या मृण्मयी सावोजीवर 21-19, 22-20 असा विजय मिळविला होता. उपांत्यपूर्व फेरीत नेहा पंडितने नागपूरच्या रितिका ठाकरेचा 21-19, 19-21, 21-9 असा, रेवती देवस्थळीने नागपूरच्या वैष्णवी भालेला 21-14, 14-6 असे हरविले. या लढतीत रेवती देवस्थळेने पहिली गेम 21-14 अशी जिंकून आघाडी मिळवली होती, तर दुसऱ्या गेममध्येही रेवती देवस्थळी 14-6 अशी आघाडीवर असताना वैष्णवी भालेने दुखापतीमुळे सामना सोडून दिला. 

श्रुती मुंदडाने ठाण्याच्या मृण्मयी देशपांडेचा 22-20, 21-13, असा तर नागपूरच्या मृण्मयी सावोजीने 
मुंबई शहरच्या निधी पटेलचा 21-5, 21-6 असा पराभव केला


​ ​

संबंधित बातम्या