अझहरुद्दीनचा मुलगा गोव्याकडून खेळणार

वृत्तसंस्था
Thursday, 23 August 2018

भारताचा माजी कर्णधार महंमद अझहरुद्दीन यांचा मोठा मुलगा महंमद असादुद्दीन यंदाच्या मोसमात गोव्याकडून रणजी, तसेच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांत खेळणार आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने गोव्याच्या संभाव्य रणजी संघाच्या शिबिरात भाग घेतला असून, मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लाचलुचपत विभागाने घेतलेल्या कार्यशाळेतही उपस्थिती लावली. 

पणजी : भारताचा माजी कर्णधार महंमद अझहरुद्दीन यांचा मोठा मुलगा महंमद असादुद्दीन यंदाच्या मोसमात गोव्याकडून रणजी, तसेच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांत खेळणार आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने गोव्याच्या संभाव्य रणजी संघाच्या शिबिरात भाग घेतला असून, मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लाचलुचपत विभागाने घेतलेल्या कार्यशाळेतही उपस्थिती लावली. 

पर्वरी येथे झालेल्या कार्यशाळेत गोव्याचा आणखी एक व्यावसायिक कर्नाटकचा फलंदाज अमित वर्माही असादुद्दीन याच्यासह उपस्थित होता. गोव्याकडून खेळण्यासाठी असादुद्दीनने हैदराबाद क्रिकेट संघटनेकडून ना हरकत दाखला घेतला आहे. हैदराबाद क्रिकेट संघटनेने गतमोसमात स्थानिक स्पर्धांत चांगली कामगिरी करूनही दखलअंदाज केल्यामुळे असादुद्दीनने गोव्याकडून खेळण्याचे ठरविले आहे. या कामी जीसीएच्या एका माजी वरिष्ठ पदाधिकाऱ्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अझहरुद्दीन या मोसमात गोव्याच्या वरिष्ठ संघाचा मेंटॉर असेल, तर धीरज जाधव कुमार संघाचा प्रशिक्षक म्हणून काम बघेल. 

संबंधित बातम्या