ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-20 विश्वकरंडक अखेर लांबणीवर...आयपीएलचा मार्ग मोकळा

टीम ई-सकाळ
Monday, 20 July 2020

कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेली यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा अखेर स्थगित करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेली यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा अखेर स्थगित करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे. आयसीसीने आज जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात आस्ट्रेलिया मध्ये घेण्यात येणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.      

यंदाची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान आस्ट्रेलिया मध्ये घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सध्याच्या स्थितीनुसार ही स्पर्धा आयोजित करण्यावर आयसीसीने अजून पर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी आयसीसीने आज घेतलेल्या बैठकीत खेळाडूंचे आरोग्य व सुरक्षितता राखणे पहिली प्राथमिकता असल्याचे नमूद करत टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आयोजनाचा निर्णय देखील, ऑस्ट्रेलिया मध्ये रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निश्चितीनंतरच घेण्यात येणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हटले होते. त्यामुळे आता टी-20 विश्वचषक यावर्षी स्पर्धा रद्द झाल्याने आयपीएलचा मार्ग मोकळा झाला आहे.   

 

 

 


​ ​

संबंधित बातम्या