घराच्या शोधात आहात, शेन वॉर्न विकतोय...किंमत आहे एवढी

वृत्तसंस्था
Saturday, 21 March 2020

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे हे अलिशान घर आहे. आता त्याला हे घर विकायचं आहे. ऍस्सेनडन फुटबॉल क्लबचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू लॉयड याच्याकडून ५.४ मिलियन डॉलर वॉर्नने हे घर २००८मध्ये विकत घेतलं होतं. त्याची भारतीय रूपयांतील किंमत होती ४० कोटी रूपये. आता या घराचा लिलाव ४ एप्रिल रोजी होणार आहे.

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्न म्हणजे मस्तकलंदर माणूस. तो जेव्हा गोलंदाजीला यायचा तेव्हा भल्याभल्या फलंदाजाच्या उरात धडकी भरायची. आणि मैदानाबाहेर असायचा तेव्हा अनेक तरूणींच्या दिलाची धडकन असायचा. छानछौकी जगण्यात त्याचा कोणी हात धरणार नाही. एकदम राजेशाही त्याची जीवनशैली आहे. त्याचं घर म्हणजे जणू राजवाडाच. अत्याधुनिक सेवासुविधा त्यात नसतील तरच नवल. त्याच्या घरात बाथरूमसह पाच बेडरूम्स आहेत. वाईन सेलर, होम थिएटर, स्विमिंग पूल, स्पा अशा सुविधा त्यात आहेत.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे हे अलिशान घर आहे. आता त्याला हे घर विकायचं आहे. ऍस्सेनडन फुटबॉल क्लबचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू लॉयड याच्याकडून ५.४ मिलियन डॉलर वॉर्नने हे घर २००८मध्ये विकत घेतलं होतं. त्याची भारतीय रूपयांतील किंमत होती ४० कोटी रूपये. आता या घराचा लिलाव ४ एप्रिल रोजी होणार आहे.

वॉर्नच्या या घरात पाच बेडरूम, वाईन सेलर, होम थिएटर, स्विमिंग पूल आणि स्पा अशा सुविधा या घरात आहेत. वॉर्नने जेव्हा हे घर विकत घेतले तेव्हा त्याने जवळपास ४० कोटी रुपये मोजले होते. आताच्या बाजारभावानुसार ते ६.८ मिलियन विकले जाऊ शकते. भारतीय पैशांमध्ये त्याची किंमत ५१ कोटींपेक्षा अधिक आहे. 

लिलावात या घराला ७.४ म्हणजे ५५ कोटींपेक्षा अधिक किमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वॉर्नसाठी हा व्यवहार फायद्याचा ठरणार आहे. जर ठरल्याप्रमाणे व्यवहार झाला तर वॉर्नला १५ कोटींचा फायदा होऊ शकेल. याआधी शेन वॉर्न अशाच एका कारणामुळे चर्चेत आला होता. 

ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या भीषण आगीतील पीडितांसाठी वॉर्नने त्याच्या ग्रीन टेस्ट कॅपचा लिलाव केला होता. तेव्हा त्या कॅपला १० लाख ७ हजार ५०० ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे ४ कोटी ९२ लाख ८ हजार इतकी बोली मिळाली होती.


​ ​

संबंधित बातम्या