स्टीव स्मिथचा सराव सुरू विराट...तेरा नंबर कब आयेगा?

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

भारतातील परिस्थिती मात्र अधिक चिंताजनक होत आहे त्याच विराट मुंबईत रहात असून निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी मैदानावरील सरावास अजूनही बंद आहे.तीन महिने लॉकडाऊनमध्ये गेले. भले घरातील जिमध्ये कसरती केल्यातरी मैदानावरचा सराव सर्वात महत्वाचा असतो, विराट कधी मैदानावर येणार कधी पुन्हा हातात बॅट घेणार हा प्रश्न सर्वांनाच सतावणारा आहे.

सिडनी : तीन महिन्यानंतर आपण आज प्रथमच नेटमध्ये सराव केला अशी माहिती सध्या कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथने सोशल मिडियावरून दिली. त्याच वेळी भारतीयांचा मनात प्रश्न उभा राहिला....विराट तेरा नंबर कब आयेगा!! ऑस्ट्रेलियातील परिस्थितीत बऱ्यापेकी सुधारलेली आहे त्यामुळे मैदानावरील सरवासाठी त्यांच्या खेळाडूंना परवानगी मिळत आहे. भारतातील परिस्थिती मात्र अधिक चिंताजनक होत आहे त्यात विराट मुंबईत रहात असून निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी मैदानावरील सरावास अजूनही बंद आहे.तीन महिने लॉकडाऊनमध्ये गेले. भले घरातील जिमध्ये कसरती केल्यातरी मैदानावरचा सराव सर्वात महत्वाचा असतो, विराट कधी मैदानावर येणार कधी पुन्हा हातात बॅट घेणार हा प्रश्न सर्वांनाच सतावणारा आहे.

बीसीसीआयला विस्मरण झाले की काय? कधी होणार विवोची गच्छंती...

तीन महिन्यानंतर प्रथमच सराव...ही फारच चांगली बातमी आहे. बॅट कशी पकडायची हे मी विसलेलो नाही...असा उल्लेख स्मिथने इंस्टाग्रामवर टाकलेल्या छायाचित्रात म्हटले आहे. या छायाचित्रात तो पॅड, हेल्मेट घालून नेटमध्ये सरावासाठी सज्ज झालेला दिसत आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मार्च महिन्यापासून सर्व घडामोडी बंद झालेल्या आहेत. एप्रिल मे महिन्यातील आयपीएलही स्थगित झालेली आहे.
आयसीसीच्या कार्यक्रमानुसार ऑस्ट्रेलियाचा नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्थानविरुद्ध कसोटी सामना होणे अपेक्षित आहे त्यानंतर भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका अपेक्षित आहे.

ऑस्ट्रेलियात सापडला टेनिस 'फिक्सर'; बीसीसीआय काय पाऊल उचलणार

चेंडू कुरतडण्यात दोषी सापडल्यानंतर एका वर्षाच्या बंदी सामोरे जाणाऱ्या स्मिथने तेवढेच जोरदार पुनरामन केला अ‍ॅशेस मालिकेत धावांची पाऊस पाडला त्यामुळे विराट कोहलीकडून त्याने कसोटी अव्वल मानांकन पुन्हा मिळवले. ऑस्ट्रेलियात विश्वकरंडक ट्वेन्टी-20 स्पर्धा नियोजित आहे, परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा होणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. मात्र आयसीसीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. विश्वकरंडक स्पर्धा झाली नाही तर आयपीएल झाल्यास आपण खेळण्यास उत्सुक असल्याचे स्मिथने अगोदच सांगितलेले आहे.


​ ​

संबंधित बातम्या