'राष्ट्राध्यक्ष अन् पंतप्रधानही MSD च्या चाहत्यांच्या यादीत'

सुशांत जाधव
Wednesday, 5 August 2020

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डीन जोन्सही चाहत्यांपैकी एक आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्याने धोनीचा मोठा चाहता असल्याचे सांगितले. भारतातील आघाडीच्या क्रिकेटर्समधील धोनी एक आहे, असे जोन्स याने म्हटले आहे.  

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांची यादी मोठी आहे. एवढेच नाही तर क्रिकेटच्या मैदानातील अनेक क्रिकेटर्सही त्याचे नाव घेतल्याशिवाय एखाद्या गोष्टीला सुरुवात करत नाहीत, असचे काहीचे चित्र धोनीच्या बाबतीत पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डीन जोन्सही चाहत्यांपैकी एक आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्याने धोनीचा मोठा चाहता असल्याचे सांगितले. भारतातील आघाडीच्या क्रिकेटर्समधील धोनी एक आहे, असे जोन्स याने म्हटले आहे.  

आयपीएलमुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील T-20 मालिका स्थगित

हिदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने धोनीसंदर्भात भाष्य करताना भारताच्या पाकिस्तान दौऱ्यातील एक किस्सा देखील सांगितला. पा दौऱ्यावर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना धोनीचे लांब केस आवडले होते. केस कापू नकोस, असा सल्लाही त्यांनी धोनीला दिला होता. हा किस्सा शेअर करत महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांमध्ये राष्ट्राध्यक्ष अन् पंतप्रधानसारख्या व्यक्तींचा समावेश असल्याचे जॉन्स म्हणाला. जोन्स म्हणाला की, यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी कशी कामगिरी करतो, हे पाहण्यासाठी उत्सुक आहे. 

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...  

यंदाच्या वर्षातील 13 व्या हंगामातील आयपीएल स्पर्धा युएईत खेळवण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत धोनी चेन्नईचे नेतृत्व करताना दिसेल. इंग्लंडमध्ये रंगलेल्या मर्यादित षटकांच्या विश्वचषक स्पर्धेपासून धोनी क्रिकेटच्या मैदानातून दूर आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना रंगला होता. हा सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले. त्यापासून धोनी मैदानात दिसलेला नाही. आयपीएलच्या माध्यमातून तो पुन्हा पुनरागमन करण्यास सज्ज आहे. आयपीएलच्या सरावाला धोनीने दमदार सुरुवात केल्याचे काही व्हिडिओ व्हायरल देखील झाले होते. तोच धमाका युईत दिसावा अशी त्याच्या चाहत्यांसह जोन्सची इच्छा असेल. भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या