आयपीएलमुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील T-20 मालिका स्थगित

सुशांत जाधव
Tuesday, 4 August 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर क्रिडा क्षेत्रातील अनेक स्पर्धांचे नियोजन कोलमडले आहे. क्रिकेटही याला अपवाद नाही.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑक्टोबरमध्ये रंगणारी तीन सामन्यांची टी-20 मालिका स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने यंदाच्या वर्षांतील आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवण्याचे निश्चित केले आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येणार असून याचा परिणाम भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेवर झाला आहे. 11, 14 आणि 11 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे ब्रिस्बेन, कॅनबेरा आणि अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका नियोजित होती.

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...  

ऑस्ट्रेलियाने ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध होणारी टी-20 मालिकाही स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघामध्ये 4, 6 आणि 9 ऑक्टोबरला सामने खेळवण्यात येणार होते. ऑस्ट्रेलियासह विंडीजचे खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येत असल्याचे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे. 

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर क्रिडा क्षेत्रातील अनेक स्पर्धांचे नियोजन कोलमडले आहे. क्रिकेटही याला अपवाद नाही. कोविड-19 मुळे ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धा स्थिगित करण्याची नामुष्की ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डावर ओढावली होती. आयसीसीनने  ऑस्ट्रेलियात रंगणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआयचा आयपीएल स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला. देशातील कोरोनाजन्य परिस्थितीचा विचार करुन बीसीसीआयने ही यंदाच्या वर्षातील 13 व्या हंगमातील स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवण्याच निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत भारतासह अन्य देशातील खेळाडू सहभागी होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतील खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्याबाबत अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे.


​ ​

संबंधित बातम्या