ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात तब्बल 5 जणांचे पदार्पण

वृत्तसंस्था
Tuesday, 11 September 2018

सिडनी : चेंडू कुरतडल्याप्रकरणी नाचक्की झालेला ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा नव्याने संघबांधणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात तब्बल पाच नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात चेंडू कुरतडल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरुन बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख खेळाडू नसल्याने त्यांची कामगिरी खराब होत होती. पाकिस्तानविरुद्ध युएईविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स या वेगवान गोलंदाजांशिवाय खेळावे लागले होते. आता यांनी संघात पुनरागमन केले आहे.

ऑस्ट्रेलिया संघात मायकेल नेसेर, ब्रँडन डॉगेट, मार्नस लॅबुचॅगने, ट्रॅव्हिस हेड आणि ऍरॉन फिंच यांना कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघात मोठे बदल करण्यात आल्याचे, निवड समितीचे प्रमुख ट्रेव्हर हॉन्स यांनी सांगितले. टीम पेन याच्याकडे संघाचे नेतृत्व आहे.

संघ पुढीलप्रमाणे : टीम पेन (कर्णधार), ऍश्टन ऍगर, ब्रँडन डॉगेट, ऍरॉन फिंच, ट्रेव्हिस हेड, जॉन हॉलंड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुचॅगने, नॅथन लिऑन, मिशेल मार्श, शॉन मार्श, मिशेल नेसर, मॅथ्यू रेनशॉ, पिटर सिडल, मिशेल स्टार्क.

संबंधित बातम्या