World Cup 2019 : प्रतिकूल परिस्थितीत ऑस्ट्रेलिया 223 धावांत गारद

वृत्तसंस्था
Thursday, 11 July 2019

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली असली तरी परिस्थिती गोलंदाजीस अनुकुल होती. आर्चरने आपल्या पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलिया कर्णधार ऍरॉन फिन्चला पायचीत टिपले, तर सर्वाधिक धावांच्या शर्यतीत असलेल्या डेव्हिड वॉर्नरला वोक्‍सने ड्रेसिंगरुमचा रस्ता दाखवला.

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : वेगवान गोलंदाजीसाठी सुरुवातीला असलेले पोषक वातावरण आणि खेळपट्टी यांचा पुरेपुर फायदा घेत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी घेतला. त्यामुळे विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा डाव 223 धावांत संपुष्टात आला. माजी कर्णधार स्टीव स्मिथने झुंझार फलंदाजी करत 85 धावांची खेळी केली. 

काल पूर्ण झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीतील भारतीय फलंदाजीप्रमाणेच आज ऑस्ट्रेलियाची अवस्था झाली. अपवाद भारतीय संघ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता आज ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. दोघांचीही स्वींग होणाऱ्या परिस्थितीत नव्या चेंडूवर भंबेरी उडाली होती. 
न्यूझीलंडने भारताची 3 बाद 5 अशी दाणादाण उडवली होती आज इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्‍स यांनी ऑस्ट्रेलियाची 3 बाद 14 अशी दारुण अवस्था केली होती. भारताकडून जडेजाने झुंझार खेळी केली होती तर आज स्मिथ 85 धावांकरून खंबिरपणे उभा राहिला. 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली असली तरी परिस्थिती गोलंदाजीस अनुकुल होती. आर्चरने आपल्या पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलिया कर्णधार ऍरॉन फिन्चला पायचीत टिपले, तर सर्वाधिक धावांच्या शर्यतीत असलेल्या डेव्हिड वॉर्नरला वोक्‍सने ड्रेसिंगरुमचा रस्ता दाखवला. बदली खेळाडू म्हणून संघात दाखल झालेल्या हॅंडसकॉम्बला वोक्‍सचा चेंडू समजलाच नाही. सातव्या षटकतांच पहिले तीन फलंदाज गमावल्यामुळे स्मिथने नांगर टाकला. प्रतिकुल परिस्थितीत हमखास धैर्याने फलंदाजी करण्याची क्षमता असलेला स्मिथ दुसऱ्याच षटकांत मैदानात आला होता आणि 48 व्या षटकांत धावचीत होईपर्यंत तो मैदानात होता. 

ऍलेक्‍स कॅरीसह स्मिथने 103 धावांची भागीदारी केली. उसळता चेंडू जबढ्याला लागूनही कॅरी लढत राहिला पण अर्धशतक जवळ येताच आदील रशिदला उंच फटका मारण्याचा प्रयत्नात बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या मध्यावर रशिदने तीन झटके दिले, कॅरीचा अडसर दूर केल्यावर त्याने गुगलीवर स्टॉनिसकला चकवले अशाच प्रकारच्या चेंडूवर कमिंसलाही बाद केले. यामध्ये आर्चरने 23 चेंडूत 22 धावा करणाऱ्या मॅक्‍सवेलला हळूवार चेंडूवर चकवले. 

सातवा फलंदाज 166 धावांत गमावल्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा अचडणीत आला होता, पण स्मिथने मिशेल स्टार्कसह अर्धशतकी भागीदारीकरून संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. अखेरच्या तीन षटकांत गिअर बदलण्याची वेळ आली तेव्हा यष्टीरक्षक बटलरने नॉनस्ट्राईवरच्या यष्टींवर अचुक नेम साधून स्मिथची झुंझार खेळी संपुष्टात आणली. त्यानंतर त्यांचा उर्वरित डाव लगेचच संपुष्टात आला. 

संक्षिप्त धावफलक : 
ऑस्ट्रेलिया : 49 षटकांत सर्वबाद 223 (स्टिव स्मिथ 85 -119 चेंडू, 6 चौकार, ऍलेक्‍स कॅरी 46 -70 चेंडू, 4 चौकार, ग्लेन मॅक्‍सवेल 22 -23 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, मिशेल स्टार्क 29 -36 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, ख्रिस वोक्‍स 8-0-20-3, जोफ्रा आर्चर 10-0-32-2, आदिल रशिद 10-0-54-3)


​ ​

संबंधित बातम्या