भारतास खूश करण्यासाठी वर्ल्डकपबाबत कांगारुंचे नमते? 

संजय घारपुरे
Wednesday, 22 July 2020

आयसीसीने विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धा लांबणीवर टाकताना 2021 तसेच 2022 च्या विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धेचे ठिकाण जाहीर करणे टाळले आहे. आता या स्पर्धेबाबतचा निर्णय भारत आणि ऑस्ट्रेलियाने घ्यावा असेच सूचीत केले जात आहे.

मुंबई : आयसीसीने विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धा लांबणीवर टाकताना 2021 तसेच 2022 च्या विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धेचे ठिकाण जाहीर करणे टाळले आहे. आता या स्पर्धेबाबतचा निर्णय भारत आणि ऑस्ट्रेलियाने घ्यावा असेच सूचीत केले जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा डिसेंबर - जानेवारीतील भारत दौरा लक्षात घेऊन क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही भारतीय मंडळास सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. 

ENGvsWI : दुसरा कसोटी सामना जिंकत इंग्लंडची मालिकेत बरोबरी 

विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणार होती. मात्र ऑस्ट्रेलियात कोरोनाची पुन्हा लाट आल्याने ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला. आयसीसीने 2020 ची स्पर्धा ऑस्ट्रेलियात झाल्यास या स्पर्धेची तिकीटे तसेच त्याबाबतचे पॅकेज 2021 मध्येही कायम राहील असे स्पष्ट केले आहे. मात्र त्याचवेळी स्पर्धा 2022 मध्ये झाल्यास तिकीटे परत करण्यात येतील असे सांगत स्पर्धेचे यजमान निश्चित नसल्याचे सांगितले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 किंवा 2022 हा प्रश्न ताणून धरलेला नाही. त्यांनी खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पदाधिकारी, सामन्यांचे आधिकारी आणि चाहते या सर्वांचे हीत लक्षात घेऊन स्पर्धा लांबणीवर टाकत असल्याचे सांगितले. त्यांनी आम्ही 2021 अथवा 2022 मध्ये चाहत्यांना सर्वोत्तम स्पर्धेचा आनंद देण्यास तयार आहोत असे सांगितले. 

आयपीएलच्या आयोजनासाठी अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची मोठी घोषणा 

ऑस्ट्रेलिया क्रिकेट पदाधिकाऱ्यांसाठी विश्वकरंडक स्पर्धेपेक्षा भारताविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. ही मालिकाच क्रिकेट ऑस्ट्रेलियास आर्थिक स्थैर्य देऊ शकेल, असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी स्पर्धा लांबणीवर टाकण्याच्या आयसीसीच्या निर्णयाचे स्वागत करतानाच भारतीय संघाच्या सुरक्षित दौऱ्याकडे आता आम्ही लक्ष देणार आहोत असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रभारी प्रमुख निक हॉकली यांनी सांगितले. 

विलगीकरणात असताना भारतीय संघाचा सराव
भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी चौदा दिवसाच्या विलगीकरणाची सक्ती ऑस्ट्रेलियात नको असे म्हटले आहे. पण हे विलगीकरण अत्यावश्यक असल्याचे सांगताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्या कालावधीतही सराव होऊ शकेल यासाठी प्रयत्न असल्याचे सांगितले. विलगीकरणात असतानाही सराव केल्यास भारतीय संघ सामन्यांसाठी तयार होईल. त्यासाठी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. विलगीकरण असलेले हॉटेल मैदानानजिक असल्यास हे शक्य आहे. हे विलगीकरण केवळ भारतीय खेळाडूंसाठीच नव्हे तर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठीही असेल.


​ ​

संबंधित बातम्या