सर डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील कमालीचा योगायोग (Video)

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 14 August 2020

सर डॉन बॅडमन आणि शतकांच शतक झळकावून अनोखा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सचिन तेंडुलकर दोन्ही दिग्गजांसाठी 14 ऑगस्ट हा कमालीचा योगायोग असणारा दिवस. 

दिग्गज क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमन यांच्याकडून कौतुक होणे ही क्रिकेट जगतातील फार मोठी गोष्ट होती. 1996 च्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ब्रॅडमन यांना प्रभावित केलं. 99.94 च्या सरासरीने धावा करुन निवृत्त झालेल्या बॅडमन आणि शतकांच शतक झळकावून अनोखा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सचिन तेंडुलकर दोन्ही दिग्गजांसाठी 14 ऑगस्ट हा कमालीचा योगायोग असणारा दिवस. 

14 ऑगस्ट 1948 रोजी ब्रॅडमन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचा सामना खेळला. ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यात रंगलेल्या अ‍ॅशेस मालिकेतून त्यांनी निवृत्ती घेतली. सर डॉन ब्रॅडमन यांना अखेरच्या डावात खातेही उघडता आले नव्हते. ते बाद होऊन तंबूत परतताना प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या संघाने त्यांच्याप्रती आदर व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात शून्यावर बाद होण्यापूर्वी ब्रॅडमन यांनी 79 डावात 101.39 च्या सरासरीने 6996 धावा केल्या होत्या. त्यांना 7000 धावांचे पल्ला गाठण्यासाठी केवळ एका चौकाराची गरज होती. पण अखेरच्या डावात त्यांना खातेही उघडता आले नव्हते.  

 42 वर्षानंतर याच दिवशी 14 ऑगस्ट 1990 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपले पहिले शतक झळकावले होते. विशेष म्हणजे ब्रॅडमन यांनी ज्या संघाविरुद्ध आपला आंतरराष्ट्रीय सामन्याचा शेवट केला. त्याच संघाच्या विरुद्ध सचिनने पहिले शतक झळकावले. मँचेस्टरच्या मैदानात तेंडुलकरने वयाच्या 17 व्या वर्षी पहिल्या डावात 114 धावांची खेळी केली होती.  


​ ​

संबंधित बातम्या