पंचांना आईवरून शिवी दिल्याने कोस्टावर आठ सामन्यांची बंदी

वृत्तसंस्था
Thursday, 11 April 2019

कोस्टा अन्‌ वाद 
- 2017 मध्ये चेल्सीचे प्रशिक्षक अँटोनिओ कॉंटे यांच्याशी कोस्टाचा वाद 
- चेल्सीकडून खेळण्यास नकार देत ब्राझीलला बस्तान हलविले 
- "एफए'कडून (इंग्लंड फुटबॉल महासंघ) दोन वेळा तीन सामन्यांची बंदी 
- जानेवारी 2015 मध्ये लिव्हरपूलच्या एम्रे कॅनला मारहाण 
- त्यानंतर नऊ महिन्यांनी आर्सेनलच्या गॅब्रिएल पॉलीस्ताला लाथ मारली 

माद्रिद : चॅंपियन्स लीगमधील बार्सिलोनाविरुद्धच्या लढतीदरम्यान पंचांना आईवरून शिवी दिल्याबद्दल ऍटलेटीको माद्रिदचा स्ट्रायकर दिएगो कोस्टा याला आठ सामन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे तो उर्वरित मोसमास मुकेल. स्पॅनिश फुटबॉल महासंघाने ही कारवाई केली.

ऍटलेटीकोचे ला लीगा (स्पॅनिश अव्वल साखळी) सात सामने बाकी आहेत. चॅंपियन्स लीग आणि कोपा डेल रेय या स्पर्धांतील ऍटलेटीकोचे आव्हान यापूर्वीच आटोपले आहे. ऍटलेटीकोने ही लढत 0-2 अशी गमावली होती. कोस्टाला पूर्वार्धातच लाल कार्ड दाखवून बाहेर काढण्यात आले होते. त्याने पंच गील मॅन्झानो यांना शिवीगाळ केली होती. त्या वेळी कोस्टाने दंडाला धरले होते व कार्ड दाखविण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता, असेही मॅन्झानो यांनी अहवालात म्हटले होते. पंचांना शिवीगाळ व अपमान केल्याबद्दल चार,

तर त्यांना धरून आक्रमक वर्तन केल्याबद्दल चार सामने असे बंदीचे स्वरूप आहे.
कोस्टाने 28व्या मिनिटालाच शिस्तभंग केल्यामुळे ऍटलेटीकोला एक तासाहून अधिक वेळ दहा खेळाडूंनीशी खेळावे लागले. जेतेपदाच्या आशा कायम राखण्यासाठी या लढतीत विजय अनिवार्य असल्याचे प्रशिक्षक दिएगो सिमीओनी यांनी सांगितले होते. तो मूळचा ब्राझीलचा आहे. आधी तो ब्राझीलकडून आणि नंतर स्पेनकडून खेळला. त्याने दोन विश्‍वकरंडक स्पर्धांत स्पेनचे प्रतिनिधित्व केले आहे. कोस्टासाठी हा मोसम धक्कादायक ठरला आहे. सर्व स्पर्धांत मिळून त्याला केवळ पाच गोल करता आले आहेत. पायाच्या दुखापतीमुळे त्याला वर्षाच्या प्रारंभी दोन महिने ब्रेक घ्यावा लागला.

कोस्टा अन्‌ वाद 
- 2017 मध्ये चेल्सीचे प्रशिक्षक अँटोनिओ कॉंटे यांच्याशी कोस्टाचा वाद 
- चेल्सीकडून खेळण्यास नकार देत ब्राझीलला बस्तान हलविले 
- "एफए'कडून (इंग्लंड फुटबॉल महासंघ) दोन वेळा तीन सामन्यांची बंदी 
- जानेवारी 2015 मध्ये लिव्हरपूलच्या एम्रे कॅनला मारहाण 
- त्यानंतर नऊ महिन्यांनी आर्सेनलच्या गॅब्रिएल पॉलीस्ताला लाथ मारली 


​ ​

संबंधित बातम्या