सेरी ए फुटबॉल स्पर्धेत ब्रेसिया संघाला नमवत अटलांटाची पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर झेप 

टीम ई-सकाळ
Thursday, 16 July 2020

अटलांटा संघाने ब्रेसिया वर 6 - 2 ने विजय मिळवत, स्पर्धेच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरलेल्या अटलांटाने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.    

सेरी ए फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अटलांटा आणि ब्रेसिया यांच्यात काल बुधवारी झालेल्या सामन्यात अटलांटा संघाने ब्रेसिया संघावर जोरदार गोल करत विजय मिळवला आहे. अटलांटा संघाने ब्रेसिया वर 6 - 2 ने विजय मिळवत, स्पर्धेच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरलेल्या अटलांटाने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.    

महेंद्र सिंग धोनी हा शांत व संयमी खेळाडू - मायकल हसी      

अटलांटा आणि ब्रेसिया यांच्यातील सामन्यात, अटलांटा संघाच्या मारियो पॅसेलिकने केलेल्या तीन गोलांच्या बळावर अटलांटा संघाने ब्रेसिया वर 6 - 2 च्या फरकाने विजय मिळवला. मारियो पॅसेलिकने खेळाच्या सुरवातीलाच २ ऱ्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 55 व्या आणि 58 व्या मिनिटाला गोल केले. याव्यतिरिक्त मार्टेन डी रून 25 व्या मिनिटाला, रुसलान मालिनॉव्हस्की ने 28 व्या मिनिटाला आणि दुवान झपाटा ने 30 व्या मिनिटाला प्रत्येकी एक-एक गोल केला. तर ब्रेसिया संघातील एर्नेस्टो टॉरेग्रोसा ने खेळाच्या पहिल्या सत्रात 8 व्या मिनिटाला अटलांटा विरुद्ध पहिला गोल नोंदवला. याशिवाय निकोलस स्प्लेकने 83 व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे अटलांटा संघाने ब्रेसिया संघावर विजय मिळवत 3 अंक प्राप्त केले असून, इंटर मिलान आणि लाझीओ संघाना मागे टाकत गुणतालिकेत पुन्हा दुसरे स्थान काबीज केले आहे.                           

दरम्यान यापूर्वी, इंटर मिलानच्या संघाने टोरिनोला नमवत दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारली होती. इंटर मिलानच्या या विजयामुळे लाझीओचा संघ देखील तिसऱ्या स्थानावर घसरला होता. मात्र आता अटलांटा संघ 70 अंकांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात उद्या रंगणार दुसरा कसोटी सामना 

        
सेरी ए फुटबॉल चॅम्पियनशिप मध्ये जुवेंटसचा संघ 33 सामन्यांमध्ये 77 गुण मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम असून, अटलांटा संघाने 33 सामन्यांपैकी 21 सामन्यांमध्ये विजय मिळवत 70 अंकांसह दुसरे स्थान मिळवले आहे. तर लाझीओचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. लाझीओने 33 सामन्यांपैकी 21 सामन्यात विजय मिळवत 69 गुण प्राप्त केले आहेत. यानंतर इंटर मिलानचा संघ  68 गुणांसह चौथ्या स्थानावर आला आहे. व 57 अंकांसह रोमा पाचव्या नंबरवर आहे.      

 


​ ​

संबंधित बातम्या