ब्राँझपदक विजेता हरिश पुन्हा विकतोय चहा

वृत्तसंस्था
Saturday, 8 September 2018

नवी दिल्ली - एखाद्या खेळाडूने पदक मिळवूनही त्याचे त्यापुरते कौतुक केले जाते आणि त्याला पुन्हा जो तो पूर्वीपासूनच करत होता तेच करावे लागते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे सेपाक टकराव खेळात ब्राँझपदक मिळविल्यानंतर हरिश कुमारला पुन्हा चहा विकण्याशिवाय पर्याय नाही.

जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 69 पदकांची कमाई करताना सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. पदकविजेत्या खेळाडूंना बक्षिसांची घोषणा झाली, पण आता त्यांना पुन्हा एकदा आपल्या खडतर आयुष्याला सामोरे जावे लागत आहे. पदकविजेत्यांपैकी अनेकजण बेरोजगार आहेत, तर, काही जण विविध कामे करतात. ब्राँझपदक विजेता हरीश कुमार याला नवी दिल्लीत पुन्हा चहा विक्रीच्या कामाला लागावे लागले आहे. सेपा टकराव हा खेळ पायाचा आणि हेडरचा वापर करून व्हॉलिबॉल खेळल्यासारखा खेळला जातो.

दिल्लीतील मजनू का टीला येथे आपल्या वडीलांच्या दुकानात हरीश चहा विकण्याचे काम करतो. हरीश पुन्हा आपल्या जुन्या कामाला लागला. चहा विक्रीकरूनच हरीशच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. हरीशच्या म्हणण्यानुसार त्याचे कुटुंब मोठं आहे आणि त्या तुलनेत येणारे उत्पन्न कमी आहे. वडीलांना त्यांच्या चहाच्या दुकानात मदत करून 2 ते 6 वाजेपर्यंत सराव करतो. चहा विक्री करण्याबरोबरच हरीशचे वडील रिक्षाही चालवतात.

​ ​

संबंधित बातम्या