Asian Games 2018 : टेनिसपटू अंकिता रैनाला ब्राँझपदक

वृत्तसंस्था
Thursday, 23 August 2018

भारताचे आजच्या दिवसातील हे पहिले पदक आहे. भारताने आतापर्यंत आशियाई स्पर्धेत 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 9 ब्राँझ अशी एकूण 16 पदके मिळविली आहेत. 

जकार्ता : आशियाई कुस्ती स्पर्धेत आज (गुरुवार) पाचव्या दिवशी भारताची टेनिसपटू अंकिता रैना हिला ब्राँझपदकावरच समाधान मानावे लागले.

आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अंकिताला चीनच्या शुआई झेंग हिच्याकडून 4-6, 6-7 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. अंकिताला या सामन्यात विजय मिळवून सुवर्णपदकासाठी खेळण्याची संधी होती. मात्र, आता तिला पराभवामुळे ब्राँझपदकच मिळणार आहे. अंकिताचा पराभव झाला असला तरी रोहण बोपण्णा आणि दिवीज सरन या जोडीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या जोडीकडून पदकाची अपेक्षा आहे. 

भारताचे आजच्या दिवसातील हे पहिले पदक आहे. भारताने आतापर्यंत आशियाई स्पर्धेत 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 9 ब्राँझ अशी एकूण 16 पदके मिळविली आहेत. 

संबंधित बातम्या