नेमबाजीतील आव्हानांचे चढ-उतार अनुभवले 

अशोक पंडित 
Thursday, 2 August 2018

ऑलिंपिक कोटाही साधायचाय 
नेमबाजीतील संभाव्य पदकांचा विचार करताना गतस्पर्धेवरून अंदाज बांधणेही अयोग्य होईल. आता या स्पर्धेतील प्रकार खूपच कमी झाले आहेत. सेंटर फायर, स्टॅण्डर्ड पिस्तूलसारखे भारतीय यशस्वी होणारे प्रकारच आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. आपल्याला पुरुष नेमबाजांकडून एअर प्रकारात आशा बाळगता येतील. मी कधीही कोणत्याही नेमबाजास जास्त संधी आहे, हे सांगणार नाही. या वाढत्या अपेक्षांचे दडपण त्या खेळाडूवर येते. त्याहीपेक्षा त्याची सर्वोत्तम कामगिरी होऊनही इतरांची त्याच्याहीपेक्षा सरस कामगिरी झाल्यामुळे पदक दुरावलेले असते, तरीही अपयशाचा बोल लावला जातो. आता या नव्या प्रकारात भारतीय नेमबाजांची कामगिरी चांगली होईल, ही आशा आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर लगेचच होणाऱ्या जागतिक स्पर्धेतून ऑलिंपिकचा कोटा मिळवण्याचे लक्ष्यही त्यांना साधायचे आहे. 

आशियाई क्रीडा स्पर्धेत मी पहिल्यांदा सहभागी झालो तेव्हा सांघिक स्पर्धेत चार नेमबाज होते. त्यानंतर काही वर्षांत ते तीन झाले, आता तर दुहेरीचीच स्पर्धा झाली; एक मात्र खरे, गेल्या काही दशकांत या क्रिकेटवेड्या देशात नेमबाजी हा काय खेळ आहे, ते पदकाबाबत औत्सुक्‍य असणे हा प्रवास मी अनुभवला. आता अपेक्षांचे दडपण माध्यमांकडून किती वाढू शकते, हेही अनुभवत आहे. 

दिल्लीतील 1982 ची स्पर्धा ते 1998 चे बॅंकॉक एशियाड, हा दीर्घ प्रवास मी अनुभवला. पहिल्या स्पर्धेच्या वेळी तर मी नेमबाजी स्पर्धेत सहभागी होत आहे, याचेच औत्सुक्‍य होते. या स्पर्धेत किती चढउतार असतात, हे अनुभवले; तसेच किती कडवी चुरस असते, तेही दिसले. आम्ही खेळत असताना आशियाई क्रीडा स्पर्धा सहभागाची संधी मिळण्यापूर्वी अनुभव फार तर आशिया स्पर्धेचा असे. त्या वेळी विश्‍वकरंडक स्पर्धा सहभाग आमच्यासाठी नव्हता. त्यामुळे स्पर्धकही नवीन असत. आम्ही नेमबाज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा यात कमालीची तफावत असल्याचे सांगतो. त्याचे उदाहरण माझ्या कामगिरीतून तुम्हाला दिसेल. मी अजूनही ती 1990 ची बीजिंग स्पर्धा विसरलेलो नाही. त्या स्पर्धेपूर्वीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मी सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे बीजिंगला सुवर्णपदकाची आशा बाळगली गेली नसती, तरच नवल होते. राष्ट्रकुल स्पर्धेइतकाच स्कोअर मी बीजिंग आशियाई क्रीडा स्पर्धेत केला; पण तरीही ब्रॉंझ एका गुणाने हुकले होते. याचाच अर्थ आशियाई क्रीडा स्पर्धेत किती सरस कामगिरी आवश्‍यकच नव्हे, तर अत्यावश्‍यक असते, हे लक्षात येईल. 

ऑलिंपिक कोटाही साधायचाय 
नेमबाजीतील संभाव्य पदकांचा विचार करताना गतस्पर्धेवरून अंदाज बांधणेही अयोग्य होईल. आता या स्पर्धेतील प्रकार खूपच कमी झाले आहेत. सेंटर फायर, स्टॅण्डर्ड पिस्तूलसारखे भारतीय यशस्वी होणारे प्रकारच आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. आपल्याला पुरुष नेमबाजांकडून एअर प्रकारात आशा बाळगता येतील. मी कधीही कोणत्याही नेमबाजास जास्त संधी आहे, हे सांगणार नाही. या वाढत्या अपेक्षांचे दडपण त्या खेळाडूवर येते. त्याहीपेक्षा त्याची सर्वोत्तम कामगिरी होऊनही इतरांची त्याच्याहीपेक्षा सरस कामगिरी झाल्यामुळे पदक दुरावलेले असते, तरीही अपयशाचा बोल लावला जातो. आता या नव्या प्रकारात भारतीय नेमबाजांची कामगिरी चांगली होईल, ही आशा आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर लगेचच होणाऱ्या जागतिक स्पर्धेतून ऑलिंपिकचा कोटा मिळवण्याचे लक्ष्यही त्यांना साधायचे आहे. 

संबंधित बातम्या