Asian Games 2018 : भारताची पदकांची पंचविशी

वृत्तसंस्था
Friday, 24 August 2018

आशियाई स्पर्धेला सुरवात होऊन सहा दिवस झाले असून भारताने या सहा दिवसांत एकूण 25 पदके मिळवली आहेत. यात सहा सुवर्ण, पाच रौप्य तर 14 ब्रॉंझ पदके आहेत. 

जकार्ता : आशियाई स्पर्धेला सुरवात होऊन सहा दिवस झाले असून भारताने या सहा दिवसांत एकूण 25 पदके मिळवली आहेत. यात सहा सुवर्ण, पाच रौप्य तर 14 ब्रॉंझ पदके आहेत. 

आशियाई स्पर्धेचा आज सहावा दिवस आहे. आज भारताने दोन सुवर्ण, चार ब्रॉंझ पदके तर एक रौप्य पदक पटकावले आहे. भारत गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहे.  
भारताला आतापर्यंत सर्वात जास्त 9 पदके नेमबाजीमध्ये मिळाली आहेत. नेमबाजीत भारताने 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि तीन ब्रॉंझ पदके पटकावली आहेत. कुस्तीमध्ये भारताला बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी सुवर्णपदक मिळवून दिलं, तर एक ब्रॉंझही भारताच्या नावावर आहे.

देश सुवर्ण रौप्य ब्रॉंझ एकूण
चीन 64 46 27 137
जपान 29 30 41 100
दक्षिण कोरिया 21 25 28 74
इराण 12 11 8 31
भारत 6 5 14 25

रोइंगमध्ये भारताने एका सुवर्ण आणि दोन ब्रॉंझ, अशी तीन पदके पटकावली आहेत. कबड्डीमध्ये महिला संघाला रौप्य, तर पुरुष संघाला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले आहे. टेनिसमध्येही भारताने एक सुवर्ण आणि एक ब्रॉंझ, अशी दोन पदके पटकावली आहे. तसेच नेमबाजीत हिना सिंधूने ब्रॉंझ पदक पटकावले आहे. भारताला वुशूमध्ये चार ब्रॉंझ पदके मिळाली आहेत, तर सापेकटकरावमध्ये  एक ब्रॉंझ पदक मिळाले आहे.


​ ​

संबंधित बातम्या