पाक खेळाडूंना हिरो बनायची संधी : सर्फराज

सुनंदन लेले
Tuesday, 18 September 2018

भारत पाकिस्तान सामना म्हणल्यावर प्रेक्षकांमधे उत्साह सळसळतो. दोन्ही बाजूचे पाठीराखे आपापल्या संघाला जोरदार पाठिंबा देतात. मला वाटते सर्वोत्तम खेळ करायला प्रेक्षकांचा आवाजी सहभाग मोठी प्रेरणा देतो.

दुबई : भारताविरुद्ध सामना खेळताना दडपण असते हे मान्य करून मी पुढे म्हणेन, की हा सामना म्हणजे दोन्ही बाजूच्या खेळाडूंकरता हिरो बनायची संधी असते. जो खेळाडू सर्वोत्तम खेळ करून आपल्या संघाला विजयाचा मार्ग दाखवतो तो नॅशनल हिरो बनतो. आम्ही आमच्या खेळाडूंना हेच सांगतो आहोत की ही संकट नाही तर संधी म्हणून बघा, असे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी आशिया करंडकात सामना होत आहे. जगभराचे या सामन्याकडे लक्ष आहे. या सामन्याविषयी सर्फराज म्हणाला, की शेवटी झालेल्या सामन्यात आम्ही भारतीय संघाला पराभूत केले होते तो आत्मविश्वास खेळताना आम्हाला जाणवेल. दुबईमधे खेळायचा आम्हाला थोडा अनुभव आहे, ज्याचा किंचित फायदा होईल. भारतीय संघात विराट कोहली नाही ती कमतरता फलंदाजीत त्यांना जाणवेल. भारतीय संघ म्हणून कमजोर आहे असे मला अजिबात वाटत नाही. आमच्या संघाबद्दल बोलायचे झाल्यास तंदुरुस्तीत झालेली सुधारणा फायद्याची ठरणार आहे. मुख्य गोलंदाज मोहंमद आमीरला गेल्या काही सामन्यात जास्त फलंदाजांना बाद करता आलेले नाही पण आमचा प्रमुख स्ट्राईक गोलंदाज म्हणून त्याची क्षमता बघता तो लवकरच टॉप फॉर्ममधे गोलंदाजी करेल याची मला खात्री आहे. 

भारत पाकिस्तान सामना म्हणल्यावर प्रेक्षकांमधे उत्साह सळसळतो. दोन्ही बाजूचे पाठीराखे आपापल्या संघाला जोरदार पाठिंबा देतात. मला वाटते सर्वोत्तम खेळ करायला प्रेक्षकांचा आवाजी सहभाग मोठी प्रेरणा देतो.

संबंधित बातम्या