Asia Cup 2018 : हॉगकाँगविरुद्ध पाकची विजयाची औपचारिकता 

वृत्तसंस्था
Sunday, 16 September 2018

संक्षिप्त धावफलक ः हॉंगकॉंग 37.1 षटकांत 116 (किंचीत शहा 26, एझाझ खान 27, उस्मान खान 3-19, हसन अली 2-19, शादाब खान 2-31) पराभूत वि. पाकिस्तान 23.4 षटकांत 2 बाद 120 (इमाम उल हक नाबाद 50, बाबर आझम 33, फखर झमान 24) 

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हॉंगकॉंगच्या लढतींना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचा दर्जा दिला खरा; पण हॉंगकॉंग आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला माफक आव्हानही देऊ शकले नाहीत. पाकिस्तानने 117 धावांचे लक्ष्य 8 विकेट आणि 158 चेंडू राखून सहज पार केले. 

एकेरी धावा घेण्यातही हॉंगकॉंग फलंदाजात सामंजस्य नव्हते, त्यामुळे प्रसंगी पाकिस्तानचे थ्रो चुकल्यावरही हॉंगकॉंग फलंदाज धावचित झाले. अखेरच्या विकेटच्यावेळी मिडऑनवरील पाक क्षेत्ररक्षकाचा नेम चुकला गोलंदाजाने चेंडू थोपवत तो यष्टीरक्षकाकडे फेकला आणि हॉंगकॉंग फलंदाज धावचित झाला. हेच हॉंगकॉंग डावाचे चित्र होते. हॉंगकॉंगचा डाव 37.1 षटकांत 116 धावांत आटोपल्यावर पाकिस्तानने 23.4 षटकांत 2 बाद 120 धाव करून विजय मिळविला. 

हॉंगकॉंगचा डाव सावरणार असे वाटत असतानाच ते विकेट बहाल करीत होते. जमलेली सलामीची जोडीही धावचितमुळेच फुटली होती. अर्थात पाकिस्तान गोलंदाजांच्या कमालीच्या भेदकेतने हॉंगकॉंग फलंदाज धास्तावले होते. पाक गोलंदाजांनी जणू भारताविरुद्धच्या लढतीचा चांगलाच सराव करून घेतला. 

फलंदाजीतही पाकचा कस लागला नाही. इमाम ऊल हकने एक बाजू लावून धरण्याची जबाबदारीच आपण पार पाडणार असल्याचे दाखवले. तो दोनदा दूरचित्रवाणी पंचांच्या मदतीमुळे वाचला. त्याने कमालीची चिकाटी दाखवली आणि बाबर आझमने चेंडूस धाव या गतीने धावा करीत लक्ष्य सोपे केले. 

संक्षिप्त धावफलक ः हॉंगकॉंग 37.1 षटकांत 116 (किंचीत शहा 26, एझाझ खान 27, उस्मान खान 3-19, हसन अली 2-19, शादाब खान 2-31) पराभूत वि. पाकिस्तान 23.4 षटकांत 2 बाद 120 (इमाम उल हक नाबाद 50, बाबर आझम 33, फखर झमान 24) 

संबंधित बातम्या