Asia Cup 2018 : शिखर धवनचे शतक; फलंदाजांचा सराव

सुनंदन लेले
Tuesday, 18 September 2018

भारतीय संघात पुनरागमन करताना अंबाती रायुडुने विश्वासाने फलंदाजी करून अर्धशतक ठोकले. धोनी शून्यावर बाद झाल्यावर प्रेक्षक नाराज झाले. दिनेश कार्तिक षटकार मारायच्या प्रयत्नात बाद झाला तो बाबरने घेतलेला झेल प्रेक्षणीय होता. 50 षटकांचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 7 बाद 285 चा धावफलक उभारला होता. केदार जाधव 27 धावा काढून नाबाद राहिला.

दुबई : नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय हाँगकाँगच्या कर्णधाराने घेतला आणि धावांच्या वाहत्या गंगेत शिखर धवनने हात धुऊन घेतले. आशिया कप स्पर्धेच्या पहिल्या साखळी सामन्यात खेळताना भारतीय फलंदाजांनी 50 षटकात 7 बाद 285 धावा केल्या. शिखर धवनने 127 धावांची शतकी खेळी उभारून धावफलकाला आकार दिला. अंबाती रायुडुने अर्धशतक करून चांगली साथ दिली. हॉंगकॉंगच्या गोलंदाजांनी 7 भारतीय फलंदाजांना बाद करून चांगले यश मिळवले.

भारतासमोर सामना खेळताना कर्णधार अंशुमन रथ याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेऊन जणू विळीवर पाय ठेवला. रोहित शर्मा हवेतून फटका मारायच्या नादात झेलबाद झाल्यावर शिखर धवन आणि रायुडुने मोठी भागीदारी रचली. इंग्लंडमधे साफ अपयशी ठरलेल्या शिखर धवनने दुबळ्या हाँगकाँगसमोर मान खाली घालून फलंदाजी करताना फॉर्म परत मिळवला. 14वे एक दिवसीय शतक ठोकताना शिखरने फक्त 105 चेंडू घेतले. 

भारतीय संघात पुनरागमन करताना अंबाती रायुडुने विश्वासाने फलंदाजी करून अर्धशतक ठोकले. धोनी शून्यावर बाद झाल्यावर प्रेक्षक नाराज झाले. दिनेश कार्तिक षटकार मारायच्या प्रयत्नात बाद झाला तो बाबरने घेतलेला झेल प्रेक्षणीय होता. 50 षटकांचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 7 बाद 285 चा धावफलक उभारला होता. केदार जाधव 27 धावा काढून नाबाद राहिला.

​ ​

संबंधित बातम्या