भारतच जिंकणार आशिया करंडक : अझरुद्दीन

वृत्तसंस्था
Sunday, 23 September 2018

पाकिस्तानचा साखळी फेरीत पराभव केल्यामुळे भारतच आशिया करंडक जिंकेल असे मला वाटते. भारतीय संघाची कामगिरी चांगली होत आहे. पाकिस्तानविरुद्धचा विजय हा एकतर्फी होता.

नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवेल, असे मत माजी कर्णधार अझरुद्दीनने व्यक्त केले आहे.

भारतीय संघाने आशिया करंडकात साखळीतील दोन्ही सामने आणि सुपर फोरमधील बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला आहे. भारतीय संघाकडून चांगली कामगिरी होत असून, भारताकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे. भारताची आज (रविवार) पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढत होत आहे. त्यापूर्वीच अझरुद्दीनने भारत जिंकू शकतो असे म्हटले आहे.

अझरुद्दीन म्हणाला, की पाकिस्तानचा साखळी फेरीत पराभव केल्यामुळे भारतच आशिया करंडक जिंकेल असे मला वाटते. भारतीय संघाची कामगिरी चांगली होत आहे. पाकिस्तानविरुद्धचा विजय हा एकतर्फी होता. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात परिस्थिती वाईट असली तरी नंतर कामगिरी सुधारली आहे. रोहितकडून गोलंदाजीत करण्यात येत असलेले बदल हे चांगले आहेत आणि गोलंदाजही आपली कामगिरी चोख पार पाडत आहेत. 

संबंधित बातम्या