मुस्तफिजूरने वाचविली बांगलादेशची लाज; अफगाणिस्तान बाहेर

वृत्तसंस्था
Monday, 24 September 2018

बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करत 7 बाद 249 धावा केल्या होत्या. मेहमुदुल्लाहने 74 आणि इमरूल कायसने नाबाद 72 धावांची खेळी करत बांगलादेशला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली होती. या आव्हानापुढे अफगाणिस्तानने चांगली सुरवात केली. पण, त्यांना शेवटपर्यंत झुंज देता आली नाही.

अबूधाबी : नवख्या अफगाणिस्तानने बांगलादेशला घाईला आणल्याचे आशिया करंडकात रविवारी पाहायला मिळाले. बांगलादेशचा सर्वोत्तम गोलंदाज मुस्तफिजूरच्या गोलंदाजीमुळे बांगलादेशला अफगाणिस्तानकडून पराभवापासून वाचावे लागले. बांगलादेशने अवघ्या तीन धावांनी विजय मिळविला.

आशिया करंडकात सुपर फोरमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यासह बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत झाली. दोन्ही संघांना आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय आवश्यक होता. अखेर पहिल्या सामन्यात भारताकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या बांगलादेशने विजय मिळविला. आता पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यानंतर भारताबरोबर अंतिम फेरीत कोण खेळणार हे निश्चित होणार आहे.

बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करत 7 बाद 249 धावा केल्या होत्या. मेहमुदुल्लाहने 74 आणि इमरूल कायसने नाबाद 72 धावांची खेळी करत बांगलादेशला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली होती. या आव्हानापुढे अफगाणिस्तानने चांगली सुरवात केली. पण, त्यांना शेवटपर्यंत झुंज देता आली नाही. शाहिदी आणि शेहजाद यांनी अर्धशतके केली. मात्र, ती संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानने शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी फक्त 7 धावांची गरज असताना सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले.


​ ​

संबंधित बातम्या