Asia Cup 2018 : अफगाणिस्तानची बांगलादेशवर सहज मात 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 September 2018

तळातील फलंदाजांच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने आशिया करंडकात गुरुवारी आपली विजयी मालिका कायम राखली. त्यांनी बांगलादेशाचा 136 धावांनी पराभव केला. 

अबु धाबी : तळातील फलंदाजांच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने आशिया करंडकात गुरुवारी आपली विजयी मालिका कायम राखली. त्यांनी बांगलादेशाचा 136 धावांनी पराभव केला. 
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघानला गलबदिन आणि रशिद खान यांच्या आक्रमकतेमुळे 7 बाद 255 धावांची मजल मारता आली. त्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी बांगलादेशाचा डाव 119 धावा रोखला. मुजीब उल रहमान, गुलबदिने नैब आणि रशिद खान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. 
आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशाला सुरवातच चांगली मिळाली नाही. लिटॉन दास आणि नमझमुल हुसेन ही सलामीची जोडी झटपट तंबूत परतली. त्यानंतर मधल्या फळीला गुलबदिनने स्थिरावू दिले नाही. बांगलादेशाची अवस्था 4 बाद 43 अशी असताना शकिब अल हसन आणि महमुदुल्ला ही जोडी स्थिरावली असे वाटले. पण, या जोडीला रशिदनने तंबूचा रस्ता दाखवून बांगलादेशाच्या आव्हानातील हवा काढून घेतली. त्यानंतर बांगलादेशाचे उर्वरित चार फलंदाज 29 धावांचीच भर घालू शकले. 
त्यापूर्वी, अफगाणिस्तानाची देखील अवस्था काही वेगळी नव्हती. महंदम शहजाद आणि हशमुल्ला शाहिदी यांच्या संयमुाळे त्यांना वेग राखता आला होता. मात्र, ही जोडी फुटल्यावर त्यांचा डाव 40 षटकांत 7 बाद 160 असा अडचणीत आला होता. अखेरच्या दहा षटकांत गुलबदिन नैब आणि रशिद खान यांनी 95 धावांची भागीदारी करून बांगलादेशाचे आव्हान उभे केले. गुलबदिनने 38 चेंडूंत 5 चौकारांसच्या सहाय्याने नाबाद 42, तर रशिदने 32 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने नाबाद 57 धावा केल्या. सामन्याला कलाटणी देणारी हीच भागीदारी ठरली. 

संक्षिप्त धावफलक 
अफगाणिस्तान 50 षटकांत 7 बाद 255 (हशमुल्लाह शाहिदी 58, रशिद खान नाबाद 57, गुलबदिन नैब नाबाद 42, शकिब अल हसन 4-42) वि.वि. बांगलादेश 42.1 षटकांत सर्वबाद 119 (शकिब अल हसन 32, महमुदुल्ला 27, मोसाडेक हुसेन 26, मुजुब उर रहमान 2-22, गुलबदिन नैब 2-30, रशिद खान 2-13)

संबंधित बातम्या