Asia Cup 2018 : अफगाणिस्तानकडून हरल्याने श्रीलंकेचे पॅकअप

वृत्तसंस्था
Tuesday, 18 September 2018

संक्षिप्त धावफलक :
अफगाणिस्तान : ५० षटकांत सर्वबाद २४९ (महम्मद शहजाद ३४, इशानुल्लाह ४५, रेहमत शाह ७२ -९० चेंडू, ५ चौकार, हशमतुल्लाह शाहिदी ३७, रशिद खान १३, मलिंगा १०-०-६६-१, थिसारा परेरा १०-०-३९-५, अखिल धनंजया ५-०-२२-२) विवि श्रीलंका ः ४१.२ षटकांत सर्वबाद १५८ (थरांगा ३६, थिसारा २८, मुजीब २-३२, गुल्बदीन २-२९, नबी २-२०, रशीद खान २-२६)

दुबई छ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी ओळख निर्माण करणाऱ्या अफगाणिस्तानने आशिया करंडकात श्रीलंकेला ९१ धावांनी गारद करीत सनसनाटी सलामी दिली. दुसऱ्या पराभवासह लंकेला गाशा गुंडाळावा लागला.

अफगाणिस्तानने ५० षटकांत २४९ धावांपर्यंत मजल मारली.    त्यानंतर त्यांनी श्रीलंकेचा डाव १५८ धावांत संपविला. सलामीला बांगलादेशकडून मोठी हार  स्वीकारावी लागलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांना सुरुवातील फारसे चांगले यश मिळाले नाही. अंतिम टप्प्यात मात्र थिसारा परेराने चमक दाखवली.

महम्मद शहजाद आणि इशानुल्लाह्‌ यांनी अफगाणिस्तानला अर्धशतकी सलामी दिली. मात्र, त्यानंतर त्यांची ३ बाद ११० अशी अवस्था झाली होती. रेहमत शाहने किल्ला लढवत ७२ धावांची खेळी केली. 

संक्षिप्त धावफलक :
अफगाणिस्तान : ५० षटकांत सर्वबाद २४९ (महम्मद शहजाद ३४, इशानुल्लाह ४५, रेहमत शाह ७२ -९० चेंडू, ५ चौकार, हशमतुल्लाह शाहिदी ३७, रशिद खान १३, मलिंगा १०-०-६६-१, थिसारा परेरा १०-०-३९-५, अखिल धनंजया ५-०-२२-२) विवि श्रीलंका ः ४१.२ षटकांत सर्वबाद १५८ (थरांगा ३६, थिसारा २८, मुजीब २-३२, गुल्बदीन २-२९, नबी २-२०, रशीद खान २-२६)

संबंधित बातम्या