अश्विनी पोनप्पा, लक्ष्य सेन यांच्यासह अन्य खेळाडूंचा बॅडमिंटन सराव सुरु

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

बॅडमिंटन खेळाडूंनी नियमीत सरावास सुरुवात केली आहे.

भारताचे आघाडीची बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा आणि लक्ष्य सेन यांच्यासहीत जवळपास 20 खेळाडूंनी बेंगलोर येथे प्रकाश पादुकोन बॅडमिंटन अकादमी (पीपीबीए) मध्ये पुन्हा सरावास सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसमुळे बंद झालेल्या क्रीडा आयोजने पुन्हा सुरु होण्याकडे टाकलेले पहिले पाऊल आहे. लॉकडाऊनच्या काळात दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. पण आता बॅडमिंटन खेळाडूंनी नियमीत सरावास सुरुवात केली आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)ने मागच्या महिन्यात सराव पुन्हा सरु करण्यासाठी नियम घालून दिले आहेत. “मागच्या दोन आठवड्यांपासून बरेच दिग्गज खेळाडू सराव करत आहेत, आमच्याकडे 16 बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध आहेत, आमच्याकडे 65 पेक्षा जास्त खेळाडू सध्या शहराच्या बाहेर आहेत पण ते परत येण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या जवळपास 20 भारतीय खेळाडू सध्या येथे सराव करत आहेत. आम्ही प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वेळा ठरवून दिल्या आहेत.” अशी माहिती पीपीबीएचे मुख्य प्रशिक्षक आणि संचालक विमल कुमार यांनी यावेळी सांगीतले. 

"लॉकडाऊनमध्ये विराटने घरबसल्या कमावले कोट्यावधी रुपये!"

सध्या अकादमीमध्ये सराव करत असलेल्या खेळाडूंमध्ये राष्ट्रकुल खेळांमध्ये तीन वेळा पदक जींकलेली खेळाडू अश्विनी पोनप्पा, अजय जयराम आणि लक्ष्य या खेळाडूंचा समावेश आहे. त्या व्यतिरीक्त मिथुन मंजुनाथ, बीएम राहूल भारद्वाज आणि मेसनाम मेइराबा हे खेळाडू देखील सराव करत आहेत. 
 


​ ​

संबंधित बातम्या