'मंकडींग'बाबत अश्विनने सुचविला नवा नियम 

टीम ई-सकाळ
Monday, 24 August 2020

यंदाच्या आयपीएल हंगामापूर्वी आर अश्विनने 'मंकडींग' या विवादास्पद प्रकारावर आपली भूमिका कायम ठेवत, सोशल मीडियाच्या ट्विटरवरून नवा नियम सुचविला आहे.

2019 मधील इंडियन प्रीमिअर लीगच्या बाराव्या हंगामात आर अश्विन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार होता. त्यावेळेस किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यात राजस्थानचा फलंदाज जोस बटलरने आक्रमक फलंदाजी करत पंजाबविरुद्धच्या सामन्यात संघाचे आव्हान जिवंत ठेवले होते. अशा वेळी आश्विनने त्याच्या गोलंदाजीवर बटलरला वादग्रस्तरित्या धावबाद केले होते. आश्विन चेंडू टाकण्यासाठी येत असताना बटलर नेहमीप्रमाणे नॉन-स्ट्रायकरच्या क्रीझमधून किंचित बाहेर आला होता. आणि नेमके याचवेळेस आश्विनने चेंडू न टाकता बटलरला धावबाद केले होते. 

धोनीच्या फेअरवेल सामन्यासाठी बीसीसीआय तयार 

अनुभवी फिरकीपटू आर आश्विनची ही कृती क्रिकेटच्या नियमांमध्ये बसणारी होती. परंतु तरीही हा प्रकार खिलाडूवृत्तीला अजिबात साजेशी नव्हती. त्यानंतर डेल स्टेन, इऑन मॉर्गन, बेन डकेट या क्रिकेटपटूंसह सोशल मीडियावरील असंख्य युझर्सने आश्विनच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली होती. किंबहुना, समालोचक मॅथ्यू हेडन आणि ब्रेंडन मॅकलम यांनीही तीव्र नापसंती दर्शविली.

...जेंव्हा विराट कोहलीने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले ; वाचा सविस्तर   

त्यानंतर यंदाच्या आयपीएल हंगामापूर्वी आर अश्विनने 'मंकडींग' या विवादास्पद प्रकारावर आपली भूमिका कायम ठेवत, सोशल मीडियाच्या ट्विटरवरून नवा नियम सुचविला आहे. आर अश्विनने सुचविल्या या नियमानुसार जेव्हा एखादा नॉन-स्ट्रायकर फलंदाज क्रीझमधून किंचित बाहेर येतो, त्यावेळेस गोलंदाजाने टाकलेला चेंडू गोलंदाजासाठी 'फ्री बॉल' समजला पाहिजे, असे म्हटले आहे. तसेच आर अश्विनने या सुचवलेल्या नियमाची तुलना मर्यादित षटकांच्या प्रकारात लोकप्रिय ठरलेल्या 'फ्री हिट' नियामासोबत केलेली आहे. व या 'फ्री बॉल' नुसार फलंदाज 'मंकडींग' च्या माध्यमातून बाद झाल्यास फलंदाजी संघाला पाच धावा देण्यात याव्यात आणि त्यामुळे टी -20 सारख्या क्रिकेट प्रकारात देखील गोलंदाजांना अधिक संधी मिळण्याची शक्यता असल्याचे आर अश्विनने म्हटले आहे. 

दरम्यान, यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी आर अश्विनने दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक व ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने आर अश्विन संघात सामील झाल्यानंतर त्याच्यासोबत चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.             


​ ​

संबंधित बातम्या