Schoolympics 2019 : टेनिस स्पर्धेत छत्रपती शाहू विद्यालयाच्या अश्‍विन नरसिंघाणीला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

टेनिस स्पर्धेत छत्रपती शाहू विद्यालयाच्या (सीबीएसई) अश्‍विन नरसिंघाणीने सुवर्ण, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या (सीबीएसई) ओम बुरगेने रौप्य, तर श्रीमंत माईसाहेब बावडेकर हायस्कूलच्या तन्मय देशपांडेने कांस्यपदक पटकाविले.

कोल्हापूर : १४ वर्षांखालील मुलांच्या एकेरी टेनिस स्पर्धेत छत्रपती शाहू विद्यालयाच्या (सीबीएसई) अश्‍विन नरसिंघाणीने सुवर्ण, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या (सीबीएसई) ओम बुरगेने रौप्य, तर श्रीमंत माईसाहेब बावडेकर हायस्कूलच्या तन्मय देशपांडेने कांस्यपदक पटकाविले. दुहेरीत अश्‍विन नरसिंघाणी व श्रीशैल शिरहट्टीने सुवर्ण, ओम बुरगे व अमन तुराकियाने रौप्य, तर नंदन गायकवाड व चैतन्य ठाणेदारने कांस्यपदकावर नाव कोरले. 
मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय

क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर स्पर्धेचे आयोजन केले होते. 
अंतिम सामन्यात अश्‍विनने ओमला ८-४, तर तृतीय क्रमांकाच्या लढतीत तन्मयने सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूलच्या आयुष पाटीलला ८-०ने हरविले. दुहेरीत शाहू विद्यालयाच्या अश्‍विन नरसिंघाणी व श्रीशैल शिरहट्टीने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ओम बुरगे व अमन तुराकियाचा ८-५, तर छत्रपती शाहू विद्यालयाच्या (सीबीएसई) नंदन गायकवाड व चैतन्य ठाणेदारने डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतनच्या ऋग्वेद लाड व कणाद मेहताला ८-४ गुणफरकाने हरविले.


​ ​

संबंधित बातम्या