अश्विन जगातील सर्वोत्तम स्पिनर : ग्रॅमी स्वान

वृत्तसंस्था
Tuesday, 28 August 2018

इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वान यांने भारताचा फिरकी गोलंदाज अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज आहे, असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे. तर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान हा ट्वेंटी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचेही त्याने सांगितले.

लंडन : इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वान यांने भारताचा फिरकी गोलंदाज अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज आहे, असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे. तर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान हा ट्वेंटी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचेही त्याने सांगितले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ''अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम ऑफ स्पिनर आहे. त्याचे उपखंडातील विक्रम उल्लेखनीय आहेत आणि त्याने एजबस्टनच्या मैदानावर केलेली कामगिरी मला प्रचंड भावली आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लियॉनने मायदेशात उत्तम कामगिरी केली आहे. अश्विनकडे त्याच्यापेक्षा जास्त विविधता असल्याने माझ्यामते तो सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे.''

अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 324 बळी घेतले आहेत. सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत त्याने तीन सामन्यांमध्ये आठ बळी घेतले आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. इंग्लंडविरुद्धचा चौथा सामना 30 ऑगस्टला सुरु होणार आहे.  


​ ​

संबंधित बातम्या