आशिष धावला तीन दिवसांत 333 किमी मॅरेथॉन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 September 2018

पुणे : पुण्याच्या आशिष कासोदेकरने (वय,47) "ला अल्ट्रा' नुब्रा खोऱ्यातील तांगलांग खिंडीतून जाणारी 333 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. अंतिम रेषा पार केल्यानंतर त्याने तिरंगा झळकावला. तीन दिवस दररोज प्रत्येकी 111 किलोमीटर असे शर्यतीचे स्वरूप कल्पनेच्या पलीकडे आव्हानात्मक होते. 

पुणे : पुण्याच्या आशिष कासोदेकरने (वय,47) "ला अल्ट्रा' नुब्रा खोऱ्यातील तांगलांग खिंडीतून जाणारी 333 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. अंतिम रेषा पार केल्यानंतर त्याने तिरंगा झळकावला. तीन दिवस दररोज प्रत्येकी 111 किलोमीटर असे शर्यतीचे स्वरूप कल्पनेच्या पलीकडे आव्हानात्मक होते. 

जगातील खडतर मॅरेथॉनमध्ये याची गणना होते. याचे कारण जगातील सर्वाधिक उंचीच्या तीन खिंडींमधून मार्ग जातो. समुद्रसपाटीपासून 17400 फुटांपेक्षा जास्त उंचीवरील या भागात ऑक्‍सिजनचे प्रमाण 60 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असते. त्यामुळे ही शर्यत मानवी दमसासाचे प्रतीक मानले जाते. यापूर्वी ही मॅरेथॉन पूर्ण केलेले सर्व दहा स्पर्धक परदेशी होते. यंदा 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान शर्यत झाली. 

23 तारखेला संध्याकाळी सहा वाजता नुब्रा खोऱ्यातल्या सुमुर गावातून सुरू झाली. 333 च्या पाच स्पर्धकांबरोबर 222 आणि 111 किलोमीटर धावणाऱ्या एकूण 51 धावपटूंनी धावायला सुरवात केली. 111 किलोमीटरचे अंतर सर्व धावपटूंनी 20 तासांत पूर्ण केले, तर 222 किलोमीटरचे अंतर 48 तासांत पूर्ण केले. 111 किलोमीटरचे अंतर पार करताना धावपटूंना जगातली सर्वांत उंच अशी खार्दुंगला खिंड पार करायची होती. 222 किलोमीटरच्या धावपटूंनी सर्वांत कठीण अशी वारीला खिंड पार केली. आणि त्यानंतर फक्त पाच धावपटूंनी आणखी खडतर असा 333 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्यास सुरवात केली. दिल्लीच्या मुनिष आणि मनदीप नंतर पूर्ण करणारा हा तिसराच भारतीय व पहिला पुणेकर ठरला. 

31 सेकंद अगोदरच पूर्ण 

दोन दिवसांत 222 किलोमीटर केल्यावर अजून 111 किलोमीटर पूर्ण करणे आणि ते ही तांगलांग ला सारख्या 175500 फूट उंचीच्या खिंडीला सर करणे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. तांगलांग खिंडीनंतर 20 किलोमीटरवर देब्रिनग गावात शर्यतीची सांगता होते. आशिषने ही शर्यत, निधारित 72 तासांच्या तुलनेत केवळ 31 सेकंद बाकी ठेवून खूपच रोमांचकारी पद्धतीने 71 तास 59 मिनिटे 29 सेकंद वेळेत पूर्ण केली. 


​ ​

संबंधित बातम्या