Happy Birthday Virat Kohli : सुरवंटाचं फुलपाखरु झालं...

हर्षदा कोतवाल
Tuesday, 5 November 2019

इंग्लंड दौऱ्यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार शतके झळकाविली. दक्षिण आफ्रिकेतही तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्यानंतर सुरु झालेला कोहलीचा प्रवास आज पाहणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या खेळाचे कौतुक करण्यास भाग पाडत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर कोषात गेलेल्या सुरवंटाचं आज फुलपाखरु झालं आहे.

निर्जीव खेळपट्टीवरही स्वत:च्या कौशल्याने चेंडू सीमापार करण्याच विराट कोहलीचा हातखंडा आहे. बॅट आणि वेगाचे समीकरण आणि लवचिक मनगटाच्या जोरावर प्रगल्भ झालेली त्याची खेळाण्याची पद्धत गोलंदाजाच्या आक्रमणाला हाणून पाडते. त्याच्या प्रत्येक अचूक शॉटसमोर प्रतिस्पर्धी संघाचे क्षेत्ररक्षण फिके पडते. 

बीसीसीआयने 'तो' व्हिडिओ शेअर करून 'रन मशीन'ला दिल्या शुभेच्छा

गोलंदाजांची ताकद असलेले दोन्ही प्रकारचे चेंडू तो अत्यंत सहजतेने खेळतो. तो यॉर्कर खेळायला डगमगत नाही. तसेच मागच्या पायावर जास्त वजन देत आखूड टप्प्याचे चेंडूही तो सीमापार करतो. कोहली एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो रुढीबद्ध क्रिकेटही खेळतो. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफमध्ये सरळ फटके मारत चेंडू मैदानाबाहेर भिरकावतो.   

Image result for virat kohli

कोहलीच्या खेळातील शिस्त ही त्याची जमेची बाजू असली तरी त्यांनी ती प्रचंड मेहनत करुन कमाविली आहे. 2012मध्ये झालेल्या आयपीएलच्या मोसमात त्याच्या शारिरिक तंदुरुस्तीने धोक्याची घंटा वाजविली. जर येणारा बराच काळ वरच्या फळीत फलंदाजी करायची असेल तर डाएट आणि व्यायामाला महत्त्व देणे फार गरजेचे आहे हे त्याला त्यावेळी कळून चुकले. त्याचप्रमाणे 2014 मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यात आलेल्या अपयशाने कोहलीला फलंदाज म्हणून बदलण्यास भाग पाडले. 

Image result for virat kohli 2014 england series

Happy Birthday Virat Kohli : नव्या पिढीचा बॅटींग मास्टर!

कोहलीच्या पूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये शारिरिक तंदुरुस्तीला कोणीच एवढे महत्त्व दिले नव्हते. कोहलीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये 'फ्याड' मानला जाणाऱ्या 'फिटनेस'चे ट्रेंडमध्ये रुपांतर झाले. 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत कोहलीने त्याच्या तंदुरुस्तीचे रहस्य उलगडले होते. कोहली गेली अनेक वर्षे रोज ठरल्याप्रमाणेच दिवसभराचा आहार घेतो. या मुरलेल्या दिल्ली बॉयने गेली चार वर्षे बटर चिकन आणि नानला हातही लावलेला नाही यावर विश्वास ठेवणेच अवघड आहे. हे झालं आहाराचं. या व्यतिरिक्त कोहली व्यायालाही तेवढेच महत्त्व देतो. या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तो स्पर्धा नसताना चार तास तर स्पर्धा असताना जिममध्ये रोज दीड तास व्यायाम करतो. त्याने स्वत:ला लावलेल्या या सवयीमुळे आता संघातील इतर सर्व खेळाडूही शारिरिक तंदुरुस्तीचा गांभीर्याने विचार करु लागले आहेत.   

कोहलीच्या मते एक झेल घेण्यासाठी लागणाऱ्या वेळात खेळाडूने केलेला व्यायाम, घेतलेला आहार, त्याचे मानसिक स्वास्थ्य या सगळ्या गोष्टी परावर्तित होत असतात. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसंह धोनीने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी भारताला सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. कोहलीने स्वत:पासूनच सुरवात करत याची पहिली पायरी रचली. त्यामुळेच सध्या कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ मानला जातो.  

2014 च्या इंग्लंड दौऱ्यात कोहली सर्वात खराब कामगिरी करणारा खेळाडू ठरला. कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही प्रकारात त्याला मैदानावर साधे टिकून राहण्यातही अपयश आले. संघातील त्याच्या स्थानावर सर्व स्तरातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले. यानंतरच कोहलीने आपल्या खेळातील तंत्र बदलण्यासाठी मेहनत घेण्यास सुरवात केली. 2014च्या इंग्लंड दौऱ्यात त्याच्या पायाच्या हलचाली चुकत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. 

Image result for virat kohli 2014 england series

इंग्लंड दौऱ्याआधी त्याने स्वत:वर धावा करण्याचे खूप दडपण आणल्याचे एका मुलाखतीत मान्य केले आणि या दडपणामुळेच त्याला धावा करण्यात अपयश आले.  इंग्लंडमधील अपयशाची त्याने दोन कारणे सांगितली : 1. फलंदाजीची चुकीची पद्धत आणि 2. अतिघाई  

INDvsBAN : पत्रकाराच्या प्रश्नावर रोहित म्हणतो 'मसाला चाहिये, लेकिन दुंगा नही!'

इंग्लंड दौऱ्यानंतर कोहली सर्वात पहिली कोणती गोष्ट शिकली असेल तर ती म्हणजे चेंडू सोडून देणे. सुरवातीपासूनच आक्रमक प्रवृत्ती असलेल्या कोहलीसाठी चेंडू न खेळता सोडून देण्याची कला अवगत करणे सर्वात कठीण होते. फलकावर धावा लावणे गरजेचे असतेच मात्र फलंदाजाची फिरकी घेणाऱ्या चेंडूचा मान राखून तो सोडून देणेही तितकेच गरजेचे असते हे कोहलीला आता चांगलेच उमगले होते. 

मैदानावर निर्णय घेण्यात कोहली कमी पडत होता आणि हेच त्याच्या वारंवार येणाऱ्या अपयशाचे कारण होते. समोरुन येणारा चेंडू कसा वळणार, तो कसा खेळायचा, त्यासाठी बॅट किती उघडायची हे कोडे कोहलीला इंग्लंडमध्ये सुटलेच नाही. गोलंदाजाच्या हाताकडे लक्ष एकाग्र करणे हे त्याच्या चंचल स्वभावामुळे त्याला पूर्वी कधी जमलेच नाही. डोक्याच्या सततच्या विचित्र हालचालींमुळे त्याला गोलंदाजाच्या हाताकडे लक्ष देण्याचे कधी सुचलेच नाही. इंग्लंड दौऱ्यानंतर त्याने या सर्व आघाड्यांवर कठेर परिश्रम घेतले.

Image result for virat kohli 2014 england series

 इंग्लंड दौऱ्यानंतर त्याने रोज तीन तास फलंदाजीचा सराव करुन स्वत:च्या तंत्रात सुधारणा केली. इंग्लंड दौऱ्यात फलंदाजी करताना त्याच्या पायाची पहिली हालचाल ही कव्हर पॉईंटकडे होण्याऐवजी पॉईंटकडे होत होती. इंग्लंड दौऱ्यानंतर त्याने पहिल्यांदा यावर काम केले. त्याने सरावादरम्यान स्वत:च्या खेळाचे शूटींग केले. वेळोवेळी फक्त हेच पाहिले की चेंडू मारताना पायाची पहिली हालचाल ही कव्हर पॉईंटकडे होते की नाही. त्याने दहा दिवस दिवसातून तीन तास हा सराव केला. त्याकाळात सचिनने त्याला वेगवान गोलंदाजीचा सामना करण्यासाठी मदत केली असे तो आजही आवर्जून सांगतो.  

इंग्लंड दौऱ्यात त्याचा खेळासह तो मानसिकरित्याही खचला. अशा प्रकारे वारंवार अपयश सहन करणे आणि त्यातून बाहेर येऊन पुन्हा चांगली कामगिरी करणे वाटते तेवढे सोपे नसते. मात्र कोहली या आघाडीवर कधीच खचला नव्हता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीपासून कोहलीकडे एक जमेची बाजू नेहमी होती, ती म्हणजे त्याचा आत्मविश्वास. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने इंग्लंड दौऱ्यातील अपयशावर मात केली. 

इंग्लंड दौऱ्यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार शतके झळकाविली. दक्षिण आफ्रिकेतही तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्यानंतर सुरु झालेला कोहलीचा प्रवास आज पाहणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या खेळाचे कौतुक करण्यास भाग पाडत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर कोषात गेलेल्या सुरवंटाचं आज फुलपाखरु झालं आहे.


​ ​

संबंधित बातम्या