टीम इंडियातील 'चॉकलेट बॉय'च्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

टीम ई-सकाळ
Wednesday, 27 November 2019

महत्त्वाची गोष्ट म्हणजे टी-20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सुरेश रैना हा पहिला भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज आहे.

भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने क्रिकेटच्या इतिहासात विक्रमांची नोंद केली आहे. त्यापैकीच एक असलेल्या डावखुरा फलंदाज सुरेश रैनाचा आज वाढदिवस.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सुरैश रैनाचा जन्म 27 नोव्हेंबर 1986 ला उत्तर प्रदेशातील मुरादनगर येथे झाला. लहानपणीच क्रिकेटमध्येच करिअर करायचं असं ठरवलं होतं. त्यानंतर भारतीय संघातील महत्त्वाचा ऑलराऊंडर खेळाडू अशी आपली ओळख निर्माण केली. सध्या खराब फॉर्ममुळे तो संघाबाहेर आहे. मात्र, तरीदेखील त्याच्याबद्दल चाहत्यांच्या मनात असलेले प्रेम काही कमी झालेले नाही. बीसीसीआयनेही आपल्या ट्विटर पेजवरून एक व्हिडिओ अपलोड करत रैनाला हटक्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला सुरवात

30 जुलै 2005 रोजी श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढच्याच वर्षी रैनाला टी -20 मध्येही संधी मिळाली. 1 डिसेंबर 2006 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळला. मात्र, भारताच्या कसोटी संघात जाण्यासाठी त्याला बराच काळ थांबावे लागले होते. रैनाने 26 जुलै 2010 ला श्रीलंकेविरुद्धच आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरूवात केली होती. 

Image may contain: 1 person, smiling, outdoor

रोहित-विराटला जे जमले नाही ते रैनाने करून दाखवलंय!

सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 322 सामन्यांत 7987 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 7 शतके आणि 48 अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे टी-20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सुरेश रैना हा पहिला भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज आहे. त्याच्याआधी कोणत्याही भारतीय फलंदाजाने टी-20 क्रिकेटमध्ये शतक केलेले नाही.

Image may contain: 1 person, playing a sport, standing and outdoor

2010 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने 59 चेंडूत 101 धावांची शतकी खेळी केली होती. ज्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने तुफान कामगिरी करत त्याने दमदार एन्ट्री केली. पहिला 3000 धावा करणारा फलंदाज, सर्वात जास्त षटकार ठोकणारा फलंदाज, सर्वाधिक मॅच खेळणारा फलंदाज असे अनेक विक्रम त्याच्या नावावर जमा आहेत. आयपीएलमध्येही शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला असता. मात्र, त्याचे शतक केवळ 2 धावांनी हुकले. यामुळे 'मिस्टर आयपीएल' ही पदवीही त्याला मिळाली आहे.

कोचच्या मुलीशी केले लग्न केले

सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांका हे एकाच कॉलनीत राहत असल्याने बालपणापासूनच एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र, प्रियांकाचे कुटुंब दुसरीकडे राहायला गेल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. प्रियांकाचे वडील हे सुरेश रैनाच्या शाळेत क्रीडा शिक्षक होते. तर या दोघांच्या आई एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी होत्या.

Image may contain: 2 people, people smiling, sunglasses, outdoor and close-up

2008 साली या दोघांची विमानतळावर भेट झाली. रैना आयपीएलची मॅच खेळण्यासाठी बंगळूरला निघाला होता. तर प्रियांका जॉबसाठी नेदरलँडला निघाली होती. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना रैनाला त्याच्या आईने नेदरलँडच्या एका मुलीशी तुझे लग्न ठरवले असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याला आपले लग्न प्रियांकाशी ठरले असल्याचे कळाले. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing

ऑस्ट्रेलिया दौरा संपवून भारतात परतल्यानंतर 3 एप्रिल 2015 ला सुरेश आणि प्रियांका लग्नबेडीत अडकले. या जोडीला ग्रासिया नावाची एक मुलगीही आहे. 

Image may contain: 3 people, people smiling, beard


​ ​

संबंधित बातम्या