रात्रीस कसोटी चाले...

शैलेश नागवेकर
Thursday, 31 October 2019

प्रकाशझोतात कसोटी सामना ही काळाची गरज आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दुबईमध्ये हे प्रयोग झालेले असले तरी क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या भारताने (बीसीसीआयने) विचार केला नव्हता, ठिकाण, हवामान, चेंडू  आणि इच्छाशक्ती अशी अनेक कारणे आहेत.

सौरव गांगुली एकही ट्वेन्टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, पण बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी केवळ नऊ-दहा महिनेच असल्यामुळे प्रशासनात एकामागोमाग एक असे निर्णय घेत टी-10 खेळण्यास मात्र सुरुवात केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंसाठी मानधन करार करण्याच्या विचाराला मूर्तरुप देत असतानाच भारतात पहिला वहिला प्रकाशझोतात कसोटी सामना खेवळणे चुटकीसरशी निश्चितही केले. आठवडा भरात घडलेल्या या घडामोडी...हे गांगुलीच करु शकतो.

प्रकाशझोतात कसोटी सामना ही काळाची गरज आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दुबईमध्ये हे प्रयोग झालेले असले तरी क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या भारताने (बीसीसीआयने) विचार केला नव्हता, ठिकाण, हवामान, चेंडू  आणि इच्छाशक्ती अशी अनेक कारणे आहेत. पण प्रकाशझोतात पाच दिवसांचा प्रथम श्रेणी सामना खेळवण्याचा पहिला प्रयोग भारतात झालेला आहे. १९९६ मध्ये ग्वाल्हेर येथे मुंबई विरुदध दिल्ली यांच्यात रणजी अंतिम सामना खेळवण्यात आला होता. त्या अगोदर ऑस्ट्रेलियातही देशांतर्गत स्पर्धेत असाच प्रयोग झाला होता, परंतु तो सामना चार दिवसांचा होता. आयसीसीच्या नियमाप्रमाणे ग्वाल्हेर येथील सामना झालेला असला तरी त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आणि प्रकाशझोतात कसोटी खेळवण्यास सुरुवात झाली ती परिस्थिती वेगळी आहे. प्रयोगांतर्गत आणि विचारांर्गत अनेक बदल झाले आणि चेंडूपासून सामन्याच्या वेळेपर्यंत अनेक बदल झाले.

प्रकार वेगळे आव्हानंही वेगवेगळी

तसे पहायला गेले तर ऑस्ट्रेलियातील १९९२ च्या विश्वकरंडक क्रिकेटपासून प्रकाशझोतात क्रिकेट खेळले जात आहे. मर्यादित षटकांचे क्रिकेट प्रकाशझोतात होतात तर कसोटी सामने खेळायला काय हरकत आहे, असा प्रश्न सहाजिकच पडू शकतो पण ते तेवढे सोपे नाही. खेळ एकच असला तरी वेगळा प्रकार वेगवेगळ्या आव्हानांचा असतो. याचा सविस्तर उहापोव पुढील प्रमाणे 

1) चेंडू
प्रकाशझोतातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये पांढऱ्या रंगाचा चेंडू वापरला जातो. पण काळानुसार त्याच्या वापरातही बदल झाले. सुरुवातील एकच चेंडू पूर्ण ५० षटके वापरला जायचा पण गवताच्या हिरव्या रंगामुळे पांढरा रंगाचे लॅकर जो मुळ चेंडूवर लावला जायचा तो निघून जाऊन चेंडूंचा रंगच बदलायचा त्यामुले तो फलंदाजांनी व्यवस्थित दिसत नसयाचा त्यामुळे ३५ षटकांनंतर चेंडू बदलण्याचा नियम करण्यात आला मात्र तोही व्यवहार्य नव्हता कारण दुसरा नवा चेंडू टणक तर असायचा आणि त्याचा फायदा फलंदाजांना शिवाय दोन्ही बाजूला लकाकी असल्यामुळे तो रिव्हर्स स्वींगसाठी उपयोगी नव्हता. आता तर दोन्ही बाजूने नवे चेंडू वापरण्यात येतात.

परंतू पांढऱ्या रंगाचा चेंडू कसोटी क्रिकेटसाठी योग्यतेचा नाही हे लक्षात आल्यावर गुलाबी रंगाचा चेंडू वापरण्याचा विचार पुढे आला. जो चेंडू सूर्यप्रकाश आणि विद्यूत प्रकाशात व्यवस्थित दिसू शकेल. (मुळात प्रकाशझोतातील सामने पूर्ण प्रकाशझोतात होत नाहीत अर्धा वेळ तरी सूर्यप्रकाशात खेळ होतो त्यामुळे दोन्ही वेळेस चेंडू व्यवस्थित दिसणे क्रमप्राप्त आहे) पण या गुलाबी चेंडूबाबतही काही काही ठिकाणी अडचणी येत आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये चेंडू हा सुद्धा तेवढाच महत्वाचा घटक आहे.

हे लक्षात घ्यायला हवे. नवा कोरा चेंडू स्वींग आणि सिम होत असतो तसेच टणकपणामुळे तो चांगल्या प्रमाणात उसळतही असतो. एकाच बाजूची त्याची लकाकी कायम ठेवण्यात येत असल्यामुळे तो नंतर रिव्हर्स स्वींगसाठी उपयोगी होतो. आणि जसा जुना होतो तसा फिरकीसही मदत करू लागलो त्यामुळे चेंडू नवा असो वा जून तो गोलंदाजांना संधी निर्माण करणारा असतो. हा मुलभूत हेतू कायम ठेवून गुलाबी रंगाच्या चेंडू तयार करण्यात येत आहेत.

2) दव
प्रत्येक देशातील वेगवेगळ्या हवामानाचाही विचार कसोटी क्रिकेट प्रकाशझोतात खेळवण्यासाठी महत्वाचा ठरत असतो. आपल्या देशात तर मुंबई, पुणे आणि नागपूर या महाराष्ट्रातील हवामानातच (उन्हाळा-थंडी) विषमता असते तर मुंबईस कोलकता, किंवा उत्तर भारत येथील हवामान एकाच वेळी सारखे असेल असे नाही. यात प्रामुख्याने सायंकाळी पडणारे दव हे अत्यंत्य परिणामकारक ठरू शकते.

दवाचा त्रास होऊ नये म्हणून आपल्याकडे एकदिवसीय क्रिकेटचे सामने काही वेळा वेळेपेक्षा लवकर सुरु केले जातात. आयपीएलमध्ये तर टाईमआऊटच्या वेळी दोरखंडाला टॉवेल बांधून दवाचा ओलसपणा पुसला जातो. मुंबई तर सामना सुरु होण्याअगोदर एक विशिष्ट प्रकारचे लॅकर मैदानावर स्प्रे केले जाते तरीही दवामुळे मैदान ओले होते त्याचा परिणाम चेंडूवर होतो असा ओलसर झालेला चेंडू ना स्वींग होत ना फिरकीला मदत करत. असे दव पडणारे ठिकाण असेल तर कसोटी क्रिकेटला त्याचा मोठा फटका बसू शकतो कारण पाच दिवस हा त्रास सहन करून फलंदाज आणि गोलंदाजांना समान संधी मिळणे सोपे नाही. आता कोलकात्यात नोव्हेंबरच्या अखेरीस सायंकाळी दव पडेल की नाही यावर लक्ष असेल.

3) संधी प्रकाश
प्रकाश मग तो सूर्याचा असो वा विद्यूत, फलंदाजासाठी फारच महत्वाचा असतो. सर्व नजरेचा खेळ असतो. एखादा फलंदाज फलंदाजीसाठी येत असताना तो आकाशाकडे पहातो तो याच कारणासाठी प्रकाशाशी नजर एकरुप होण्यासाठी तो असे करत असतो. पण सूर्य अस्ताला जात असताना आणि त्याच वेळी विद्यूत प्रकाश सुरु असतानाची वेळ फलंदाजांची कसोटी पहाणारी असते. त्यामुळे प्रकाशझोतातील कसोटी सामने किती वाजता सुरु होणार हे महत्वाचे आहे.

मुंबई-दिल्ली प्रकाश झोतातील रणजी सामन्यात अमोल मुझुमदारला अशा प्रकाशाशी मिळते जुळते घेताना अडचणी आल्या होत्या. तो सामना दुपारी साडे तीन वाजता सुरु व्हायचा आणि दोन तासांच्या खेळानंतर ब्रेक होऊन पाऊण तासाने म्हणजे सव्वा सहाच्या वेळेस खेळ पुन्हा सुरु व्हायचा. त्यामुळे पहिले सत्र पूर्ण सूर्यप्रकाशात आणि नंतरचे सत्र विद्यूत प्रकाशात. अमोल मुझुमदार पहिल्या सत्रात शतकाच्या जवळ गेला होता. पण विश्रांतीनंतर परत आल्यावर त्याला प्रकाशाशी मिळते जुळते घेणे कठिण गेले कसेबसे सावरत त्याने त्यावेळी शतक केले होते. आता कोलकातातील भारताताल पहिला वहिला कसोटी सामना दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे म्हणजे अखेरचे सत्रच विद्यूत प्रकाशात होईल.

टीम इंडियाची कसोटी
भारताने गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे दौरे केले त्या त्यावेळी या दोन्ही देशांनी भारताला प्रकाशझोतात कसोटी खेळण्याचे प्रस्ताव दिले होते. पण आपणच्या खेळाडूंना अनुभव नसल्याचे सांगत विराट कोहली आणि टीम इंडियाने ते प्रस्ताव नाकारले होते. पण आताही कोणताही अनुभव नसताना भारतीय संघ या आव्हानाला सामारे जाणार आहे. त्यात बांगलादेशविरुद्धची हा कसोटी सामना कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला आहे त्यामुळे वर्चस्व असले तरी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. येत्या शुक्रवारपासून टी-20 मालिका सुरु होईल त्यानंतर 14 ते 18 ऑक्टोबर दरम्यान पहिला कसोटी सामना झाल्यानंतर लगेचच 22 ऑक्टोबरपासून प्रकाशझोतातला सामना होणार आहे म्हणजे सरावासाठी अवघे तीनच दिवस मिळणार आहेत.


​ ​

संबंधित बातम्या