अरमान भाटिया, साई संहिता चमर्थीची मात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 December 2018

पुणे : पाचगणी येथे सुरू असलेल्या रवाईन हॉटेल करंडक अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत पुरुष गटात अरमान भाटिया तर महिला गटात साई संहिता चमर्थीने आपली आगेकूच कायम राखली आहे. 

एमएसएलटीएच्या मान्यतेने पाचगणी येथील रवाईन हॉटेलच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत महिला गटात कर्नाटकच्या दुसऱ्या मानांकित प्रतिभा नारायणने आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या नेहा घारेचा 6-3, 6-1 असा सरळ पराभव केला.

अंतिम फेरीत प्रतिभा नारायणाची गाठ अव्वल मानांकित तमिळनाडूच्या साई संहिता चमर्थीशी पडणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित तमिळनाडूच्या साई संहिता चमर्थीने आपली विजयी मालिका कायम तिसऱ्या मानांकित तेलंगणाच्या श्राव्या चिलकलापुड्डीचा 6-1, 6-3 असा पराभव केला. 

पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित दिल्लीच्या अनुराग नेनवानीने पश्‍चिम बंगालच्या अव्वल मानांकित ईशाक इकबालचा 7-5, 6-1 असा पराभव केला, तर आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या अरमान भाटियाने कर्नाटकाच्या निक्षेप रवीकुमारचा 6-4, 6-0असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. 

उपांत्य फेरीचे निकाल असे :
पुरुष गट :
अनुराग नेनवानी (दिल्ली) वि.वि. ईशाक इकबाल (पश्‍चिम बंगाल) 7-5, 6-1, अरमान भाटिया (महाराष्ट्र) वि.वि. निक्षेप रवीकुमार (कर्नाटक) 6-4, 6-0. 
महिला गट : साई संहिता चमर्थी (तमिळनाडू) वि.वि. श्राव्या चिलकलापुड्डी (तेलंगणा) 6-1, 6-3, प्रतिभा नारायण (कर्नाटक) वि.वि. नेहा घारे (महाराष्ट) 6-3, 6-1

​ ​

संबंधित बातम्या