पुण्यातील रौप्य पदक विजेती नताशा पावसामुळे बेघर

टीम ई सकाळ
Tuesday, 6 August 2019

- नताशा राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक विजेती
- आई घरकाम करते तर वडील बिगारी कामगार मात्र, सध्या काहीच काम नाही
- नताशाचा लहान भाऊही राज्यस्तरावर तिरंदाजी खेळतो

पुणे : शहारात गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये पुण्यातील तिरंदाजी खेळणारी राष्ट्रीय खेळाडू नताशा डूमणे हीचाही समावेश आहे. कोंढव्यात राहत असलेल्या नताशाचे घर अतिवृष्टीमुळे कोसळले आणि त्यामुळेच तिच्यावर आता बेघर होण्याची वेळ आली आहे. 

कात्रज कोंढवा रस्त्यावरील शीतल पेट्रोल पंपाजवळ असलेल्या डायमेंशन्स आयकॉन या इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागून तिचे घर होते. 10 वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या या इमारतीच्या बांधकामात नताशाचे वडील बिगारी कामगार म्हणून काम करत होते. आता तिची आई घरकाम करुन घर चालविण्यास हातभार लावते तर वडिलांकडे सध्या कोणतेही काम नाही.  

Natasha

नताशाने दिल्ली येथे झालेल्या स्कूल नॅशनल आर्चरी स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. तसेच राज्यस्तरावरही अनेक स्पर्धेत पदकं जिंकली आहेत. गेले दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे डायमेंशन्स आयकॉन या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली आणि त्याचबरोबर त्याला लागून असलेले तिचे घरही जमिनदोस्त झाले आणि ती बेघर झाली.  

Natasha

नताशा सह तिचा भाऊ  विशाल डूमणेही राज्यस्तरीय आर्चरीपटू आहे. या परिवाराला मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्या संदर्भात 9130088459 या क्रमांकावर संपर्क साधा. या क्रमांकावर पुढील माहिती दिली जाईल. 


​ ​

संबंधित बातम्या