इंग्लंड संघासोबत जाताना आर्चर घरी थांबला

संजय घारपुरे
Thursday, 16 July 2020

वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी झाल्यावर घरी गेल्यामुळे जोफ्रा आर्चरने जैवसुरक्षित नियमांचा भंग केला. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी वगळण्यात आले असून, त्याला पाच दिवस विलगीकरणात जाण्याची सूचना देण्यात आली आहे. 

मँचेस्टर : वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी झाल्यावर घरी गेल्यामुळे जोफ्रा आर्चरने जैवसुरक्षित नियमांचा भंग केला. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी वगळण्यात आले असून, त्याला पाच दिवस विलगीकरणात जाण्याची सूचना देण्यात आली आहे. 

महेंद्र सिंग धोनी हा शांत व संयमी खेळाडू - मायकल हसी    

जैवसुरक्षित वातावरणात इंग्लंड - वेस्ट इंडिज मालिका होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या कसोटीनंतर इंग्लंड संघ एकत्रितपणे एजेस बाऊलहून ओल्ड ट्रॅफर्डला येणे अपेक्षित होते. मात्र या प्रवासादरम्यान आर्चर ब्रायटन येथे गेला असल्याचे समजले. दुसऱ्या कसोटीसाठी निवडलेल्या संघात आर्चरचा समावेश असल्याचे जाहीर झाल्यावरच हे इंग्लंड संघ व्यवस्थापनाच्या लक्षात आले.

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात उद्या रंगणार दुसरा कसोटी सामना 

कसोटी पूर्णपणे सुरक्षित होण्यासाठी खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफला जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस वापरण्याची सूचना देण्यात आली आहे. ते त्यांच्या अ‍ॅक्रिडिएशन सोबतही आहे, मात्र खेळाडू सामन्याच्या ठिकाणी पोहोचल्यावरच ते कार्यरत होते असे आता सांगण्यात आले होते. सुरक्षित प्रवासासाठी खेळाडूंनी स्वतंत्र वाहनातून प्रवास केला होता. त्यावेळी केवळ फक्त भोजनासाठी हे पथक थांबले होते असे सांगण्यात आले होते. आर्चर प्रवासाच्या दरम्यान केवळ एक तास थांबला होता. तो कोणाच्याही संपर्कात आला नव्हता असा दावा केला जात आहे. घरात काय धोका असेल असा त्याने विचार केला असे सांगितले जात आहे. दरम्यान, आर्चरने चूकीबद्दल माफी मागितली आहे. आता पाच दिवसाच्या विलगीकरणात त्याची दोनदा कोरोना चाचणी होईल. ती निगेटीव आल्यासच त्याला संघात पुन्हा प्रवेश देण्यात येईल.


​ ​

संबंधित बातम्या