भारतीय संघासोबत अनुष्काचा फोटो; सोशल मीडियात ट्रोल

वृत्तसंस्था
Wednesday, 8 August 2018

अनुष्का शर्मा या छायाचित्रात कशासाठी हवी आहे, येथून ते भारताच्या उपकर्णधाराला शेवटच्या रांगेत उभे करण्यात आले आणि अनुष्काला पहिल्या रांगेत असे अनेक प्रकारे त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. खेळाडूंच्या पत्नी अशा भेटींवेळी का उपस्थित असतात, अनुष्का भारतीय संघाची सदस्य आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.

लंडन : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, भारतीय क्रिकेटपटूंनी लंडनमधील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी भारतीय संघासोबत कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित असल्याचे छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाल्याने तिला ट्रोल करण्यात आले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) खेळाडूंवर अनेक बंधने घालण्यात आल्यानंतर आता स्वतः बीसीसीआयनेच अनुष्का सोबतचा भारतीय संघाचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केला आहे. यामुळे बीसीसीआय आणि अनुष्का शर्मा यांना सोशल मीडियात लक्ष्य करण्यात आले. या छायाचित्रात भारतीय क्रिकेट संघ आणि प्रशिक्षक एका विशेष पोशाखात दिसत आहेत. यांच्यासोबत अनुष्का शर्माही दिसत आहे. 

अनुष्का शर्मा या छायाचित्रात कशासाठी हवी आहे, येथून ते भारताच्या उपकर्णधाराला शेवटच्या रांगेत उभे करण्यात आले आणि अनुष्काला पहिल्या रांगेत असे अनेक प्रकारे त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. खेळाडूंच्या पत्नी अशा भेटींवेळी का उपस्थित असतात, अनुष्का भारतीय संघाची सदस्य आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.

संबंधित बातम्या