Video : विराटला बाबांची आठवण येताच अनुष्काने केले किस

वृत्तसंस्था
Friday, 13 September 2019

यावेळी DDCAचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी अरुण जेटली आणि कोहलीचा एक किस्सा सांगितला. कोहलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर जेटली कोहलीला भेटायला त्याच्या घरी गेले होते. वडिलांच्या निधनानंतरही कोहली सामना खेळायला गेला होता हे ऐकून त्यांनी कोहलीचे खूप कौतुक केले होते आणि तो भविष्यात खूप मोठा खेळाडू होईल असे भाकितही केले होते. 

नवी दिल्ली : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सध्याच्या घडीला सर्वांत हीट कपल आहे. अनुष्का अनेकावेळा कोहलीला चिअर करताना आपल्याला दिसली आहे. काल (ता.12) दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानाला माजी अर्थमंत्री अरुण जेटलींचे नाव देण्यात आले. त्याचवेळी स्टेडिअममधील एका स्टॅंण्डला विराट कोहलीचे नाव देण्यात आले. त्यावेळी देखील या दोघांमधील रोमान्स पाहायला मिळाला.

यावेळी DDCAचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी अरुण जेटली आणि कोहलीचा एक किस्सा सांगितला. कोहलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर जेटली कोहलीला भेटायला त्याच्या घरी गेले होते. वडिलांच्या निधनानंतरही कोहली सामना खेळायला गेला होता हे ऐकून त्यांनी कोहलीचे खूप कौतुक केले होते आणि तो भविष्यात खूप मोठा खेळाडू होईल असे भाकितही केले होते. 

आपल्या वडिलांबद्दल गोष्टी ऐकताना कोहलीला भरुन आले. त्यावेळी अनुष्काने त्याला पाठिंबा देत त्याच्या हातांना किस केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.     

​ ​

संबंधित बातम्या