रोहितनं केलं अनुष्काला अनफॉलो; वहिनींने दिला करारा जवाब 

वृत्तसंस्था
Saturday, 27 July 2019

भारताचा उपकर्णधार रोहित शर्मीने आज अनुष्का शर्माला सोशल मीडियावरुन अनफॉलो केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विराट कोहली आणि रोहित यांच्या वादारावर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. अशातच रोहितने अनफॉलो केल्यावर अनुष्काही काही गप्प बसली नाही. तिने एक पोस्ट करत रोहितला नकळत मेसेज दिला आहे.

नवी दिल्ली : भारताचा उपकर्णधार रोहित शर्मीने आज अनुष्का शर्माला सोशल मीडियावरुन अनफॉलो केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विराट कोहली आणि रोहित यांच्या वादारावर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. अशातच रोहितने अनफॉलो केल्यावर अनुष्काही काही गप्प बसली नाही. तिने एक पोस्ट करत रोहितला नकळत मेसेज दिला आहे.

''खोट्या दिखाव्याच्या गोंधळात फक्त सत्यच शांततेची हात मिळवू शकते,'' अशी पोस्ट तिने केली होती. रोहितने कोहलीपाठोपाठ आता त्याची पत्नी अनुष्का शर्माला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यामुळे त्यांच्यातील वादाला आता नवे रंगत येणार असल्याची चर्चा होती.

No photo description available.

रोहित आणि कोहली यांच्यातील कोणीच या विषयावर आजवर बोलले नाहीत. मात्र, रोहितने आता सोशल मीडियावर अनुष्काला अनफॉलो केले आहे. रोहितने यापूर्वीच कोहलीला सोशल मीडियावरुन अनफॉलो केले आहे. त्यावरुनही मागे बरीच चर्चा झाली होती. 

कोहली अजूनही रोहितला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. मात्र, रोहितची पत्नी रीतिका कोहलीच्या फ्रेंडलिस्टमध्ये नाही. अनुष्काही रोहित आणि रितिका या दोघांनाही इंस्टाग्रामवर फॉलो करत नाही. तसेच रितिकाही कोहली व अनुष्काला फॉलो करत नाही  

संबंधित बातम्या