विराट-अनुष्काला इंग्लंडमध्ये भेटला 'ब्युटिफुल बॉय'

वृत्तसंस्था
Saturday, 25 August 2018

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चौथ्या कसोटीपूर्वी पत्नी अनुष्का शर्मासोबत वेळ घालवत आहे. त्यांना या काळात नवा मित्र मिळाला आणि त्यांनी त्याचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला.

लंडन : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चौथ्या कसोटीपूर्वी पत्नी अनुष्का शर्मासोबत वेळ घालवत आहे. त्यांना या काळात नवा मित्र मिळाला आणि त्यांनी त्याचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला.

विराटने आपल्या ट्विटर अकाउंटवर फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. एका कुत्र्यासोबत या दोघांचा फोटो असून, याला त्यांनी ब्युटिफुल बॉय म्हटले आहे. एका शॉपमध्ये खरेदीसाठी गेल्यानंतर या दोघांनी या कुत्र्यासोबत गुडघ्यावर बसून फोटो काढला आहे. यावेळी त्याने लिहिले आहे, की आमच्यासोबत फोटो घेईपर्यंत थांबणाऱ्या आमच्या या नव्या सुंदर मित्राला भेटा.

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघातील खेळाडूंबरोबर त्यांच्या पत्नीही आहे. दोन सामन्यांच्या वेळादरम्यान क्रिकेटपटू आपल्या पत्नींसोबत वेळ घालवत आहेत. विराटने अनेकवेळा अनुष्काबद्दल थेट मैदानातून प्रेम व्यक्त करताना आपण पाहिले आहे. आता सोशल मिडीयावर या दोघांनी आपले पर्यटनाचेही फोटो शेअर केले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या